धक्कादायक…. डोक्याला जास्त तेल लावले म्हणून विद्यर्थिनिची आत्महत्या 

ठाणे :  पोलीसनामा ऑनलाईन

केस गळण्याचा चिंतेने  नैराश्य आलेल्या म्हैसूरमधील एका विद्यार्थिनीने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच १३ वर्षांच्या मुलीने आईने डोक्याला जास्त तेल लावले म्हणून इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली . विजया जितेंद्र भोईर असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती  आठव्या इयत्तेत शिकत होती.

सकाळची शाळा असल्याने बुधवारी सकाळी उठून विजयाने  शाळेची तयारी सुरू केली. मात्र आईने तिच्या डोक्याला जास्त तेल लावले. याच गोष्टीचा तिला राग आला आणि तिने इमारतीच्या गच्चीवर जाऊन खाली उडी मारली. यात तिचा जागीच मृत्यू झाला . अशी  माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

ठाण्याच्या बाळकुम पाडा नंबर २  टॉवरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी कापुरबावडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
जाहिरात

पालिकेचा अजब कारभार गवंड्याला अभियंत्या पेक्षा अधिक पगार

[amazon_link asins=’B00L8PEEAI,B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4256d945-b1a8-11e8-940f-c356cf9f1d5b’]

Loading...
You might also like