Lockdown मध्ये नोकरी मिळाली नाही म्हणून Girl Students ने Internet वर विकली ‘Intimate Pics’

लंडन : वृत्तसंस्था – युनायटेड किंग्डममधून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे कोरोना आणि लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे काही विद्याथ्यांचे आयुष्य खराब झाले आहे. लॉकडाऊन मुळे विद्यार्थिनींनी आपले Intimate Pics विकण्यासाठी भाग पडावे लागेल.

लॉकडाऊनमध्ये विद्यार्थिनींनी करावा लागला आर्थिक संकटाचा सामना
मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, विशेषतः स्टुडंट्स युनिव्हर्सिटीची फी भरण्यासाठी रेस्ट्रॉरंट, स्टोर, पब अथवा इतर दुकानांवर काम करतात. परंतू लॉकडाऊनमुळे अशाप्रकारचे जॉब करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले.

पीडित विद्यार्थीने सांगितली शोकांतिका
एका पीडित विद्यार्थिनीने सांगितले की ट्युशन फी चुकविण्यासाठी अनेक विद्यार्थिनींनी आपले Intimate Pics विकले आहेत. आम्ही हे मनाविरुद्ध केले आहे. आम्हाला कोणताही वेगळा मार्ग दिसत नव्हता.

काही विद्यार्थिनी प्रॉस्टिट्यूशनसोबत जोडल्या गेल्या
तेच एका विद्यार्थिनीने सांगितले की कोरोना जागतिक महामारीच्या काळात मोठ्या संख्येमध्ये विद्यार्थिनींनी प्रॉस्टिट्यूशनसोबत जोडलेल्या महिलांशी संपर्क केला होता. लॉकडाउनच्या काळात आमच्याकडे पर्याय नव्हता कारण सर्व दुकाने आणि पब बंद होते.

एक विद्यार्थिनी म्हणाली की पहिल्या लॉकडाउनच्या वेळी इंटरनेटवर Intimate Pics विकणाऱ्या विद्यार्थिनींच्या संख्येत वाढ झाली. यावेळी त्यांना मानसिकरीत्या अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले होते. अनेक क्लाइंट्सने त्यांना न विचारता त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यामुळे त्यांना खूप त्रास झाला.

गेल्या वर्षी केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की ४% विद्यार्थिनींनी आपली युनिव्हर्सिटी फी भरण्यासाठी आपले फोटो इंटरनेटवर विकले होते. त्यानंतर या सर्वेमध्ये ३,२०० विद्यार्थिनींनी प्रश्नांचे उत्तर दिले होते.