…म्हणून ‘त्या’ विचित्र आजारामुळे तिला वापरावे लागते ‘हे’ डिव्हाइस 

वृत्तसंस्था – अनेकदा माणसांना असे वेगवेगळे आजार होत असतात. ज्या आजारांची नाव सुद्धा माणसांना माहित नसतात. असाच एखादा आजार व्यक्तीला होतो आणि त्या व्यक्तीला दैनंदिन आयुष्य जगण्यास अडचणी निर्माण होतात. असाच एक आजार अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीला झाला आहे.

सोफी ड्वेर असे या तरुणीचे नाव आहे. सोफीचे शरीर आपोआप काही वेळात इतकं भीजतं की, कुणी तिच्यावर पाणी फेकावं त्यामुळे स्वत:ला कोरडं ठेवण्यासाठी तिला सोबत हेअर ड्रायर ठेवावं लागतं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोफी जेव्हा या समस्येने हैराण झाली होती, तेव्हा तिचे आई-वडील तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी सांगितले की, सोफीला हायपरडायड्रोसिस नावाचा आजारा आहे. हा असा आजार आहे, जो प्रत्येक २०० व्यक्तीतील एकाला प्रभावित करते. या आजारामुळे सामान्य व्यक्तीपेक्षा तिला १० पटीने जास्त घाम येतो. या आजारामुळे सोफीसोबतही असंच होतं. तिचे कपडे फार लवकर भीजतात, त्यामुळे दिवभरातून अनेकवेळा तिला कपडे बदलावे लागतात.

या आजाराविषयी सोफी सांगते की, ‘सतत कपडे भीजत असल्याने मला लोकांमध्ये जाण्यास अडचणी निर्माण होत आहे. या आजारामुळे माझा बॉयफ्रेन्डही मला सोडून गेलाय. आता मला कुणाशी डेट करायलाही भीती वाटते’.

हिवाळ्यात सोफीला याआजारामुळे फार जास्त अडचण येतात. कारण थंडीच्या दिवसात ती गरम कपडे परिधान करून असते. पण घाम तिच्या शरीराला थंड करतो. घामामुळे कपडे इतके भिजतात की, ते शरीराला चिकटायला लागतात. आता सोफी जेव्हाही घराबाहेर जाते तेव्हा ती सोबत हेअर ड्रायर घेऊन बाहेर जाते. घाम आल्यावर या हेअर ड्रायरच्या सहाय्य्यने हवा घेऊन घाम दूर करते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us