चुलत भावासोबत होते तरूणीचं ‘गॅटमॅट’, वडिलांनी नको ‘त्या’ स्थितीत पाहिल्यानं केलं ‘असं’ काही

पोलीसनामा ऑनलाईन : चुलतभावासोबतच आक्षेपार्ह अवस्थेत मुलीला पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या वडीलांनी चक्क तिचे डोके धडावेगळे केले. एवढेच नाही तर मुलीचे कापलेले डोके हातात घेऊन तो पोलीस ठाण्यात हजर झाला. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यामध्ये बुधवारी (दि. 3) संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयात जाणा-या एका 18 वर्षीय तरुणीचे कुटुंबातीलच चुलत भावाशी अनैतिक संबंध होते. वडिलांनी या तरुणीला दोन दिवसांपूर्वीच सदर तरुणासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. त्यावेळी ही तरुणी घटनास्थळावरून पळून गेली होती. मात्र तेंव्हापासून तिचे वडील खूप संतप्त होते. त्यानंतर ते आपल्या मुलीची आणि प्रियकराची हत्या करण्याच्या प्रयत्नात होते. अखेर बुधवारी संध्याकाळी त्यांनी मुलीच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करत तिचे डोके धडावेगळे केले. त्यानंतर त्यांनी कापलेले डोके हातात घेऊन पोलीस ठाण्याकडे निघाले. वाटेत हे दृश्य पाहून लोकांची भीतीने गाळण उडाली. पोलिसांनी या वडिलांना ताब्यात घेतले आहे. याबाबत हरदोईचे एसपी अनुराग वत्स म्हणाले की, चुलतभावासोबत अनैतिक संबध असल्याने वडील रागात होते. दरम्यान, घरात मुलीला एकटी पाहिल्यानंतर सदर व्यक्तीने दरवाजा बंद केला आणि मुलीचे डोके धडापासून वेगळे करत तिची हत्या केली. या प्रकरणी आरोपीला अटक केली असून त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील असे ते म्हणाले.