काय सांगता ! होय, तरूणी 10 वी परीक्षा देण्यासाठी घराबाहेर पडली अन् चक्क प्रियकरासोबत ‘लग्न’गाठ बांधून परतली

पोलिसनामा ऑनलाईन – प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आमचं सेम असत असं म्हंटल जात. सध्या बिहारच्या सीमाभागात कटिहार परिसरातील अशाच एका दहावीच्या मुलीने केलेल्या प्रेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. मनिहारी ठाणे हद्दीत हि मुलगी परीक्षासाठी घरातून निघून आली. अन लग्न करून परतली. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये चांगलीच रंगू लागली आहे. मागील ५ वर्षांपासून दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. लपूनछपून ते भेटत असत. या दोघांनाही गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडून पोलीस ठाण्यात आणले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिहारी ठाणे हद्दीतील असणाऱ्या लाल सुरेंद्र नारायण कन्या शाळेतील हे प्रकरण असून याठिकाणी दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू होती, प्रेयसी ही परीक्षा देण्यासाठी शाळेत आली होती. तिचं नाव नेहा (बदलेलं नाव) आहे. तर प्रियकराचं नाव नितीश आहे, नितीश हा बरारी येथील गुजरा गावात राहणारा तरूण आहे.

प्रेयसीला भेटण्यासाठी नितीश परीक्षा सेंटरवर आला होता, तेव्हा संशयावरून काही गावकऱ्यांनी दोघा प्रेमीयुगलांना पकडलं, त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं, हे प्रकरण प्रेमसंबंधांशी जोडलं गेलं आहे, हे समजताच पोलिसांनी दोन्ही कुटुंबांमध्ये मध्यस्थी करत दोघांच्या लग्नासाठी तयार केलं,आणि या दोघांचे लग्न झालं.