‘इव्हेंट’मध्ये पाकिस्तानी मुलीनं अभिनेत्री प्रियंकाला विचारला ‘प्रश्न’, ‘जय हिंद – जय भारत’सह मिळालं ‘सडेतोड’ उत्तर (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलीवूडच्या कलाकारांना अनेकदा फॅन्सच्या रागाला सामोरे जावे लागते कारण कोणता फॅन कधी काय करेल आणि पब्लिक मध्ये काय बोलेल याचा काही नेम नाही. अशीच काहीशी परिस्थिती सध्या प्रियांका चोप्रावर ओढवली होती, एका लाईव्ह इव्हेंटमध्ये एक पाकिस्तानी मुलगी अचानक प्रियांकावर ओरडली मात्र प्रियंकाने ही परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली.

मुलगी प्रियांकावर यामुळे ओरडली होती की, प्रियंकाने मार्च महिन्यात एक ट्विट केले होते ज्यामध्ये तिने भारतीय सेनेचे कौतुक केले होते. प्रियांका युनायटेड नेशन्सच्या गुडविल अँबेसिटर पदी आहे यामुळे ती मुलगी प्रियांकावर ओरडली होती. प्रियंकाने आपल्या ट्विटमध्ये फक्त एवढेच लिहिले होते “जय हिंद” (भारत अमर रहे)

काय म्हणाली नेमकं ती मुलगी प्रियंकाला ?
तुम्ही शांतता कायम ठेवण्यासाठी तू यूनायटेड नेशन्सच्या गुडविल अँबेसिटरपदी आहे आणि तू पाकिस्तानबाबतच्या न्यूक्लिअर वादा बाबत वातावरण भडकवत आहेस. तुम्ही यामध्ये नाही पडले पाहिजे कारण मी पाकिस्तानी असूनही तुझी फॅन आहे आणि असे अनेक जण आहेत ज्यांच्यामुळे तुमचा बिझनेस चालतो.

प्रियंकाने उत्तर दिल –
प्रियंका त्या मुलीला म्हणाली माझे खूप सारे मित्र पाकिस्तानी आहेत आणि मी भारतीय आहे. युद्ध ही अशी गोष्ट नाही की जी मला आवडते परंतु मी एक राष्ट्रभक्त आहे म्हणून मी त्या माझ्या फॅन्सची माफी मागते ज्यांना माझ्यामुळे वाईट वाटलं असेल. या इव्हेंटने ‘सिस्टरहूड’ची गोष्ट पुढे आणली आहे तर आपण त्यासंबंधी एकमेकांना संधी दिली पाहिजे.

आरोग्यविषयक वृत्त –