लग्‍नाचा कोणताही पुरावा नसताना सोबत राहणार्‍या ‘प्रेयसी’लाही पोटगी मागण्याचा अधिकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लग्न न करता एखादे जोडपे अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असेल तर प्रियकराला आपल्या प्रेयसीला पोटगी द्यावी लागणार आहे. असा निर्णय दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. दोघेही जर पती-पत्नीसारखे राहत असतील तर कलम १२५ अनुसार प्रेयसीला उदरनिर्वाहासाठी करण्यासाठी पैसे मागण्याचा अधिकार प्राप्त होतो असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

एक जोडपे २० वर्ष सोबत राहिले होते. ते विभक्त झाल्यांनतर कोर्टाने प्रेयसीला दर महिन्याला ५ हजार रुपये उदरनिर्वाहासाठी पोटगी देण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयाविरोधात प्रियकराने हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टाने त्याचा दावा फेटाळला आहे. सदर महिला आपली पत्नी नाही. महिलेकडे लग्नाचा कोणताही पुरावा नाही.

मग पोटगी कशी देऊ ? असा युक्तिवाद याचिकाकर्त्याने हायकोर्टात केला होता. तर आमचा कायदेशीर विवाह झाला नसला तरी आम्ही गेली २० वर्षे एकत्र राहात होतो. दोघांचेही मतदान ओळखपत्र आणि पत्ता एकच आहे. तसेच मतदान ओळखपत्रावर पतीचे नाव सुद्धा आहे. सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना याचिकाकर्त्याने स्वतःला महिलेचा पती असल्याचे म्हटले होते, याची नोंद हॉस्पिटलमध्ये आहे, असेही महिलेने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले होते.

त्यावर निकाल देताना हायकोर्ट म्हणाले की, जर एखादे जोडपे अनेक वर्षांपासून पती-पत्नीसारखे एकत्र राहत असतील तर ते जोडपे विवाहबद्ध आहेत, असे समजले जाईल. त्यामुळे महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. दोघेही जर पती-पत्नीसारखे राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे मागण्याचा अधिकार प्राप्त होतो.

आरोग्यविषयक वृत्त –

अपचनाच्या समस्येसाठी ‘वज्रासन’ फायद्याचे

केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे

सुंदर दिसण्यासाठी ‘हे’ ७ पदार्थ चेहऱ्यावर चुकूनही लावू नका

अर्थरायटिसला दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश