प्रियकराच्या ‘थडग्या’वर झोपायची ‘प्रेयसी’, जेव्हा उकरलं तेव्हा ‘भंबेरी’ उडाली पोलिसांची

सीधी : वृत्तसंस्था – मध्ये प्रदेशच्या सीधी जिल्ह्यात एक असे प्रकरण समोर आले आहे, जे समजले तर कुणाच्याही अंगावर काटा येईल. सीधीपासून 70 किलोमीटर अंतरावरील कुसमी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कमक्ष गावात एका प्रेयसीने प्रियकराचा मृतदेह राहत्या घरातच पुरला आणि पुढील दोन महिने ती त्या थडग्यावर झोपत होती. या घटनेचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा प्रियकराच्या घरच्यांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय प्रेयसी जानू सिंहचे सतना जिल्ह्यातील 27 वर्षीय इशान मोहम्मदसोबत प्रेमसंबध होते. दोघांमधील प्रेमसंबंधांची सुरूवात मोबाइल फोनचा राँग नंबर लागल्याने झाली होती. जेव्हा इशान आणि जानूचे प्रेम वाढत गेले तेव्हा जानू कटनीमध्ये जाऊन इशानसोबत राहू लागली. तेथे काही दिवस राहिल्यानंतर दोघेजण कमक्ष गावात परतले आणि तेथे राहू लागले.

कुसमी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर इशान आणि प्रेयसी जानूमध्ये 6 डिसेंबरला भांडण झाले. नंतर 7 डिसेंबरला या तरूणाने फास लावून आत्महत्या केली होती. प्रेयसी जानूचे म्हणणे आहे की, जेव्हा इशाकने आत्महत्या केली तेव्हा ती घरी नव्हती. प्रेयसी जानूने पोलिसांना सांगितले की, मृतदेह फासावर लटकताना पाहून ती घाबरली आणि तिने इशानचा मृतदेह घरातच पुरला. प्रेयसी जानू, इशानच्या थडग्यावरच दोन महिने झोपत होती.

जेव्हा इशानच्या कुटुंबियांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवली तेव्हा पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी थेट कमक्ष गावात आले आणि त्यांनी प्रेयसी जानूची चौकशी केली. तेव्हा पोलिसांना समजले की, इशानचा मृतदेह घरात पुरण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी खोदकाम करून इशाकचा मृतदेह बाहेर काढला.

याबाबत सीधीच्या सहायक पोलीस अधीक्षक अंजुलता पटले यांनी सांगितले की, खोदकाम केल्यानंतर प्रेयसीच्या घरातून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून तो पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. रिपोर्ट आल्यानंतर हे स्पष्ट होईल की, तरूणाने आत्महत्या केली होती की, त्याची हत्या करण्यात आली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like