‘प्रेग्नंट’ असताना तिला समजलं बहिणीच्या 5 मुलांचा बाप आहे ‘बॉयफ्रेन्ड’, ‘उदार’ मनानं केलं ‘माफ’

लंडन : वृत्त संस्था – ब्रिटनच्या साऊथ लंडनमध्ये एक असे प्रकरण समोर आले आहे, जे सध्या खुप चर्चेत आहे. येथे आपल्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असलेल्या एका गरोदर मुलीला समजले की, तिचा बॉयफ्रेंड आणि तिच्या बहिणीचे अनेक वर्षांपासून संबंध आहेत, तेव्हा तिला धक्का बसला. एवढेच नव्हे, जेव्हा तिने थोडी चौकशी केली तेव्हा समजले की, तिच्या बहिणीच्या 5 मुलांचा पिताही तिचा बॉयफ्रेंडच आहे.

साऊथ लंडनमध्ये राहणारी शार्लेट क्लार्क आणि गॅरी बॅनिस्टर लग्नाची तयारी करण्यात मग्न होते. तेव्हा शार्लेटला फेसबुक मेसेजद्वारे समजले की, तिची बहिण रेबेका आणि तिचा बॉयफ्रेंडम यांचे संबंध आहेत. शार्लेटला यामुळे मोठा धक्का बसला, परंतु या कहानीतील ट्विस्ट हा आहे की, तिने दोघांनाही माफ केले आहे. शार्लेटने त्यांना केवळ माफ केले नाही तर आता संपूर्ण कुटुंब एकत्र राहात आहे. शार्लेटचे म्हणणे आहे की, आता ती त्यांच्यावर रागावलेली नाही आणि आपल्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी तिला हे योग्य वाटले की, संपूर्ण कुटुंबाने एकत्र राहावे.

काय आहे संपूर्ण कथा
शार्लेटने सांगितले की, तिची भेट गॅरीशी 2005 मध्ये झाली होती. गॅरी एका पबमध्ये शेफ होता. यादरम्यान सुद्धा आपल्या अगोदरच्या रिलेशनशिपमधून त्याला दोन मुले होती. नंतर गॅरी आणि शार्लेट सोबत राहू लागले आणि त्यांनाही एक मुल झाले. 2010 मध्ये दोघांनी इंगेजमेन्ट सुद्धा केली. या दरम्यान आपल्या पर्सनल लाइफमधील काही अडचणीमुळे शार्लेटची बहिण रेबेका तिच्या सोबत राहण्यासाठी आली. सुरूवातीला रेबेकाला गॅरी पसंत नव्हता आणि दोघे एकमेकांशी बोलायचे सुद्धा नाहीत. शार्लेट सांगते की, 2010 मध्ये दोघांचे एकमेकांशी वागणे बदलले, ज्यामुळे मी आनंदी झाले.

कसे माहिती झाले
शार्लेटच्या माहितीनुसार, याच्या काही दिवसानंतर तिने गॅरी आणि रिबेकाचे फेसबुक चॅट वाचले आणि तिला धक्काच बसला. यानंतर दोघांचा साखरपुडा तुटला आणि शार्लेटने गॅरी आणि रेबेकाशी बोलणेही बंद केले. गॅरीने रेबेकासोबत विवाह केला होता अणि त्यांना 5 मुले आहेत. या संपूर्ण घटनेवर शार्लेट म्हणते, मला तेव्हा वाईट वाटले होते, परंतु आता जाणवते की हेच दोघे माझे कुटुंब आहेत आणि मी त्यांना जवळ केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like