धक्कादायक ! कंडक्टर मित्राच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – मित्राकडूनच पैशांसाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी टीएमटीमध्ये वाहक असलेल्या तरुणाविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनाली बसरा (२१) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तर जुगल राठोड नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनाली आणि तिचे वडील ठाण्यातील लोकमान्यनगर येथे राहण्यास आहेत. तिची आई खोपदा येथे राहते. दरम्यान सोनाली एका मॉलमध्ये नोकरी करत होती. तिचे आणि जुगलचे एकमेकांवर प्रेम होते. परंतु जुगल तिला अनेक दिवसांपासून पैशांची मागणी करत होता. तिने पैसे देण्यास नकार दिल्यावर तो तिला मारहाण करत होता. तसेच तिच्यावर संशयही घेत होता. या सर्व प्रकाराला कंटाळून सोनालीने आत्महत्या करणार असल्याचे आपल्या आईला फोन करून सांगितले होते. त्यानंतर २ मे रोजी वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी तिने सकाळी १० ते ३ मे रोजी १ वाजेच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली.

Loading...
You might also like