मैत्रिणीच्या प्रियकराकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार

वसई : पोलीसनामा ऑनालाइन- वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणीच्या वाईनमध्ये गुंगीचे औषध मिसळून मैत्रिणीच्या प्रियकराने लैंगिक आत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १३ फेब्रुवारी रोजी नायगाव येथे घडली असून मैत्रिणीच्या प्रियकराविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी २७ वर्षीय तरुणीने वालीव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पीडित तरुणी बोरिवलीयेथील असून तिचा १३ फेब्रुवारीला वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी ती नायगाव येथे मैत्रिणीकडे गेली होती. नायगाव मधील एका बार अँड रेस्टाँरंटमध्ये पीडित मुलगी, मैत्रिण आणि तिचा प्रियकर पार्टी करीत होते. पीडित तरुणीच्या वाईनमध्ये ती येण्याआधीच प्रियकराने गुंगीचं औषध मिसळलं होतं.

त्यानंतर दोघीजणी देखील नशेत असल्यामुळे पीडित तरुणीला तिच्या मैत्रिणीने आपल्या घरी राहण्याचा सल्ला दिला आणि ती घेऊन गेली. १३ फेब्रुवारीच्या रात्री नायगाव येथे मैत्रिणीच्या घरी मैत्रिणीच्या प्रियकराने तरुणीवर आत्याचार केला. याबाबत पीडित तरुणीने वालीव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सरला काळे करत आहेत.

Loading...
You might also like