अमर प्रेम : मृत्यूनंतरही त्याची विधवा बनून राहीन

मेरठ : वृत्तसंस्था – हल्लीच्या तरुणांचे प्रेम म्हणजे आज एकासोबत तर उद्या दुसऱ्यासोबत. पण अशा काळात अमर प्रेमाची साक्ष देणारी गोष्ट मेरठ मध्ये घडली आहे. मेरठमध्ये संजीव उर्फ शैंकी नामक तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येनंतर त्याच्या प्रेमिकेने आयुष्यभर संजीवच्याआईची सेवा करेन तसेच आयुष्यभर आपण संजीवची विधवा बनून राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच संजीवच्या घरच्यांना न्याय मिळवून देणार असल्याचेही तिने म्हंटले आहे. आजच्या काळात संजीवच्या प्रेयसीचा हा निर्धार एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणेच आहे.
काय हे प्रकरण ?
मवाना यथील जंघड़ी  गावातील रहिवासी असलेल्या संजीवची बुधवारी हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह गंगानगरच्या ललसाना  गावाच्या जंगलात कारसहित जाळण्यात आला  होता. त्याची हत्या दुसऱ्या  तिसऱ्या  कुणी नाही तर त्याच्या प्रेयसीच्या वडील आणि भावांनी मिळून केली आहे. संजीव दुसऱ्या जातीचा होता त्यामुळे संजीवचे आणि आरोपीच्या मुलीचे प्रेम मुलीच्या कुटुंबाला मान्य नव्हते. पोलिसांनी प्रेयसीच्या वडील आणि भावांना अटक केली आहे. आता संजीवच्या प्रेयसीने मात्र आपल्या कुटुंबाकडे न जाता संजीवच्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. संजीवचे नातेवाईक  तिला आपल्या सोबत घेऊन गेले आहेत. संबंधित प्रेयसी ही सज्ञान असल्यामुळे पोलिसांनी देखील तिला  संजीवच्या कुटुंबासोबत जाऊ दिले.
संजीवच्या आठवणीत त्याच्या घरीच राहीन 
या बाबतील प्रेयसीने म्हंटले आहे की , त्याच्यासोबत मी शपथ घेतली होती की, मी त्याच्या सोबतच राहीन. संजीवला माझ्या वडील आणि भावांनी मारले . संजीवने यापूर्वीच मला सांगितले होते की पुढे काही झाले तरी तू माझ्या आईची काळजी घेशील. आम्ही दोघांनी आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याची शपथ घेतली होती. देव सुद्धा गुन्हेगारांना माफ करणार नाही .
करणार होते लग्न 
स्थानिक माध्यमांशी बोलताना संजीवच्या प्रेयसीने सांगितले की ,” मी संजीवला पाच वर्षांपासून ओळखत होते. आम्ही लवकरच लगान करणार होतो. पण माझ्या कुटुंबाने जर आम्ही लग्न केले तर आम्हला मारणार अशी धमकी दिली होती. माझे वडीलच संजीवला मारतील याची कल्पना देखील मी केली नव्हती. आजपर्यंत माझे कुटुंब आणि संजीव यांच्यात एकदाही बातचीत झाली नाही. त्याची हत्या केल्यानंतर मला देखील मारहाण करून घरात कोंडून ठेवले होते. या घटनेचा खुलासा झाल्यानंतर देखील  मला पोलीस आणि माध्यमांपर्यंत  पोहचू दिले नाही. जोपर्यंत  संजीवच्या आरोपीना कठोर शिक्षा करवून देत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही , असे संजीवच्या प्रेयसीने  माध्यमांशी बोलताना सांगितले.