गर्लफ्रेंडच्या नादाला लागून बनला ‘तोतया’ पोलिस अधिकारी, घातला अनेकांना गंडा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीमध्ये एका तोतया पोलिसाला अटक करण्यात आली आहे. तोतया पोलिसाने दिल्ली पोलिसांचा गणवेश परिधान करून अनेकांना गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे. तपासादरम्यान त्याने गर्लफ्रेंडला आपण दिल्ली पोलीस दलात कार्यरत असल्याचे भासवण्यासाठी तोतया पोलीस बनला असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने पोलिसांच्या गणवेशात अनेकांना झडती घेण्याच्या बहाण्याने लुटले असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत.

त्याच्याकडून लुटलेले २५ हजार रुपये आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई साहिबाबाद येथे शनिवारी सापळा रचून करण्यात आली. आशीष चौधरी असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला तोतया पोलीस मागील अनेक दिवसांपासून लोकांना गंडवत होता. त्याने आपल्या गर्लफ्रेंडला आपण पोलीस असल्याचे खोटे सांगितले होते. पोलीस असल्याचे भासवण्यासाठी त्याने दिल्ली पोलिसांचा गणवेश शिवून घेतला होता. तसेच गाडीवर पोलीस लिहून तो अनेकांना धमकावून जबरदस्तीने त्यांची झडती घेत होता. झडती दरम्यान त्याने अनेकांकडून पैसे घेऊन त्यांना चौकीला येण्यास सांगून फरार होत होता. साहिबाबाद परिसरात अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या होत्या. नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर या ठिकाणी सापळा रचून त्याला अटक केली.

अनेकांना लुटल्याची केली तक्रार

या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना शहर पोलीस आयुक्त श्लोक कुमार यांनी सांगितले की, साहिबाबाद परिसरामध्ये राहणाऱ्या अनेक लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. एक पोलीस कर्मचारी पोलीस असल्याचे सांगून लोकांना धमकावून लुबाडत आहे. लोकांची झडती घेऊन पैसै लुटून लोकांना चौकीत येण्यास सांगत होता. मात्र, चौकीत गेल्यानंतर तो त्याठिकाणी सापडत नव्हता. त्यामुळे लोकांना त्याच्यावर संशय आला. शनिवारी अशाच प्रकारे लुटण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून दुचाकी, रोकड आणि दिल्ली पोलिसांचा गणवेश जप्त करण्यात आला आहे.

गर्लफ्रेन्डला दाखवण्यासाठी बनला तोतया पोलीस

आरोपी आशीष चौधऱी याचे एका मुलीसोबत प्रेमसंबध आहेत. त्याने दिल्ली पोलिसांत भर्ती होण्यासाठी परिक्षा दिली होती. मात्र, या परिक्षेत नापास झाला होता. दरम्यान, त्याने आपल्या प्रेयसीला आपण दिल्ली पोलीस दलात कार्य़रत असल्याचे सांगून लग्न ठरवले होते. प्रेयसीला संशय येऊ नये यासाठी त्याने हुबेहुब दिल्ली पोलिसांचा गणवेश शिवून घेतला. तसेच गाडीवर पोलीस लिहून तो तिला फिरवत होता.

गाजियाबाद शहर पोलीस आयुक्तांनी सांगितले की, आशिषला २०१४ आणि २०१७ मध्ये पोलिसांनी अटक केली होती. त्याला तुरुंगवास झाला होता. जेलमधून सुटल्यानंतर त्यांने पुन्हा लोकांना लुबाडण्याचा धंदा सुरु केला. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने आपले बस्तान दिल्ली परिसरात बसवले. याठिकाणी तो तोतया पोलीस बनून लोकांना लुबाडत होता.

 गोरी त्वचा हवी असेल तर करा हे घरगुती उपाय

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या

हृदयाच्या रक्तवाहिनी च्या आजारामुळे होतात छातीत वेदना

आरोग्यदायी जीवनासाठी नियमित दूध घ्यायलाच हवे

चांगल्या आरोग्यासाठी जीम मध्ये जाण्यास वेळ नसेल तर ‘हे’ करा

सावधान ! समुद्रात आंघोळ करणार असाल तर हे तुमच्यासाठीच आहे, जरूर वाचा

Loading...
You might also like