मुली म्हणजे ‘वस्तू’ ; अत्याचाराच्या घटनांमध्ये ९५ टक्के  चूक मुलींचीच : जैन मुनी विश्रांत सागर

सीकर (राजस्थान) : पोलीसनामा 

जैन मुनी विश्रांत सागर यांनी मुलींविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळं वाद निर्माण झाला आहे . राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात जैन मुनी विश्रांत सागर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुलींबाबत अनेक वादग्रस्त विधानं केली.इतकंच नाही तर विश्रांत सागर यांनी मुलींचा उल्लेख वस्तू असा करत त्यांनी संयमाने वागण्याची गरज असल्याचा सल्ला दिला आहे .

[amazon_link asins=’B07F1D267G,B078TK2NWL’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d47a2eb6-ac48-11e8-a8b9-67a71075b009′]

 जैन मुनी विश्रांत सागर पत्रकार परिषदेत महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर ते बोलत होते. यावेळी त्यांनी वाढत्या अत्याचाराच्या घटनांसाठी महिलाच जबाबदार असल्याचं सांगत वाद निर्माण केला आहे.मुलींनी शात राहायला हवे, असा सल्ला देत, त्यांनी मुलींना ‘वस्तू’ असे संबोधले. तसेच, मुलींवर होणाऱ्या अत्याचारांवेळी ९५टक्के चुका मुलींच्याच असतात, असेही विश्रांत सागर म्हणाले.

दौंड तालुक्यातील वाखारी जवळ गोळीबार करून मारहाण


मुलींना दिला सांभाळून राहण्याचा सल्ला 

“मुलींनी सांभाळून राहिलं पाहिजे, कारण त्यांना माहेर आणि सासर अशा दोन्हींकडील मान राखणं गरजेचं असतं. तसेच, मुलींनी पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावात येऊ नये, शिवाय संस्कारांचं शिक्षणही मुलींनी घेतलं पाहिजे.”, असे ते म्हणाले. जैन मुनी यांच्या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून टीका केली जात असून संताप व्यक्त केला जात आहे.

जाहीरात