आयटी कंपनीत महिला, तरुणी असुरक्षित

सहकाऱ्याकडून अभियंता तरुणीचा विनयभंग

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – हिंजवडी आयटी पार्क मधील कंपनीच्या प्रिंटर रूममध्ये बोलावून दोन वेळा अभियंता तरुणीचा विनयभंग केला. हा प्रकार दोन वर्षांपूर्वी टीसीएस कंपनीत घडला असून रविवारी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कंपनीच्या आतमध्ये अश्या प्रकारे अश्लील प्रकार घडत असल्याने आयटीत काम करणारी तरुणी, महिला सुरक्षित आहे का ? असा प्रश्न उपस्थित होतो.

या प्रकरणी पीडित ३२ वर्षीय विवाहित आयटी अभियंता तरुणीने फिर्याद दिली आहे. तर ऋषी मुगराय (४२, रा. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि ऋषी हे दोघे एकाच कंपनीत कामाला आहेत. ऋषी याने काम असल्याचे सांगून पीडित तरूणीला प्रिंटर रूम मध्ये बोलावून घेतले. तिथे तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करुन तिच्या सोबत अश्लील चाळे केले. हा प्रकार पीडित तरुणीने तिच्या पतीला सांगितला.

२०१६ मध्ये पुन्हा पीडित तरूणीला काही कारणाने प्रिंटर रूम मध्ये बोलावून घेतले आणि तेथे ऋषी हा नग्न अवस्थेत तिच्या समोर उभा राहून तिच्या मनास लजा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.