अनोळखी अ‍ॅपद्वारे मुलींना ‘अश्लील’ SMS, सायबर क्राईमवालेही ‘चक्रावले’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या सायबर क्राइम मोठ्या प्रमाणात वाढत असून याचा सर्वाधिक त्रास हा महिलावर्गाला करावा लागत आहे. सायबर क्राइममधून चोरी, डाटा हॅक असे प्रकारतर होतच असतात. परंतु आता औरंगाबादमधील तरूणींना अनोळखी अ‍ॅपद्वारे अश्लील एसएमएस केले जात आहे. या अ‍ॅपद्वारे पाठवलेले एसएमएस कोण पाठवत आहे. हेही लक्षात येत नसल्याने या तरूणी संतापल्या आहेत.

औरंगाबादमधील एका उच्चभ्रू कंपनीत काम करणाऱ्या तरूणीला तिच्या बॉसच्या नावाने एसएमएस करण्यात आला होता. त्याचा जाब विचारण्यासाठी तरूणीने थेट बॉसची संपर्क साधला. त्यावर बॉसच्या फोनमधून असा कोणताही मॅसेज गेला नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर तरूणीने थेट सायबर पोलीसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस या मॅसेज पाठवणाऱ्याचा सोध घेत आहेत.

पोलीसांनी तपास सुरू केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुगल प्लेवर अनेक असे अ‍ॅप आहेत. ज्यावरून स्वतःची आयडेंटीटी ओळख लपवून दुसऱ्याच्या नावाने मॅसेज पाठवता येतो. त्यामुळे मॅसेज पाठवणारा कोण आहे, हेही त्यांच्या लक्षात येत नसल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.

दरम्यान, आलेल्या मॅसेजच्या सोर्ससाठी मागणी केली असता, तिला त्यासाठी ५०० रुपये भरावे लागले. सर्वच सध्या स्मार्टफोन वापरतात. कोणताही अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्यासाठी दिलेले रुलस न वाचता ओके करत जातात. त्यामुळे अनेक समस्यांना तोंडी द्यावे लागते. अनेकदा अ‍ॅपमुळे महिलांनाच जास्त त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महिलांनी याबाबत कायम सावध राहिले पाहिजे, असं आवाहन पोलीसांकडून केले जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त