मुलीचा वाढदिवस साजरा केला नाही म्हणून परिचिताकडून हत्याराने वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – घरगुती संबंध असलेल्या दोन कुटुंबातील एका इसमाने, तुमच्या मुलीचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे बिर्याणी बनवून साजरा का केला नाही, या कारणावरून ओळखीच्या दुसर्‍या कुटुंबातील महिलेवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना निगडीत घडली आहे. या घटनेत आईला वाचवण्यासाठी पुढे आलेली महिलेची मुलगी सुद्धा जखमी झाली आहे.

आरोपीचे नाव संतोष प्रदीप गायकवाड (40, राजगृह हाऊसिंग सोसायटी, निगडी) असे आहे. त्याच्यावर यापूर्वी हाणामारीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी राजू केरप्पा गायकवाड (41, आझाद चौक, संग्राम नगर, आंबेडकर वसाहत, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.

राजू गायकवाड यांच्या मुलीच्या वाढदिवसाला दरवर्षी बिर्याणी बनवली जाते. यावर्षी वाढदिवसाला त्यांनी बिर्याणी बनवली नाही. परंतु, त्यांचे घरगुती संबंध असलेल्या कुटुंबातील संतोष गायकवाड याने मुलीचा वाढदिवस साजरा का केला नाही, बिर्याणी का बनवली नाही, अशी विचारणा त्यांच्या घरी जाऊन केली. त्यानंतर आरोपी घरी निघून केला आणि काही वेळाने त्यांने पुन्हा फोन करून वाढदिवस माझ्या घरी साजरा करू असे सांगितले.

यानंतर राजू गायकवाड यांची पत्नी आणि मुलगी आरोपीच्या घरी गेले असता त्याने पुन्हा वाद घातला. यावेळी आरोपी सदर महिलेवर तलवारीसारख्या धारधार शस्त्राने वार करण्यासाठी धावून गेला. यावेळी मुलगी मधे गेली असता तिच्या हाताच्या बोटांना आणि पंजाला दुखापत झाली. याप्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आरोपी संतोष प्रदीप गायकवाड याच्यावर यापूवी सुद्धा हाणामारीचा एक गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक वर्षाराणी घाटे यांनी दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like