‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या माॅडेलचा सपासप वार करुन खून, प्रियकराला अटक

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहणाऱ्या मॉडेलच्या डोक्यात दगड व शस्त्राने वार करुन तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकणाऱ्या प्रेमीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. आपल्याबरोबर रहात असताना तिचे दुसऱ्याबरोबर अफेअर असल्याच्या संशयावरुन त्याने तिची निर्घुण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

खुशी जगजित परिहार (वय २०, रा. हिंगणा) असे या मॉडेलचे नाव आहे. अशरफ अख्तर शेख (वय २८, रा. गिट्टीखदान, नागपूर) असे तिची हत्या करणाऱ्याचे नाव आहे.

खुशी हिला मॉडेलिंगची आवड होती. जगजित हे तिचे सावत्र वडिल आहेत. ती आईवडिलांसोबत न राहता वेगळी राहायची. शिवाय तिने आईवडिलांशी संपर्कही तोडला होता. मध्यंतरी ती अशरफ शेख याच्या संपर्कात आली. अशरफ हाही त्याच्या आईवडिलांपासून वेगळा रहात होता. पण त्यांच्या संपर्कात होता. तो काहीही कामधंदा करीत नव्हता. तो वडिलांच्या पैशांवर स्वत:च्या व तिच्या गरजा भागवत होता. दोघेही गिट्टीखदान येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून रहात होते. ती रात्री अनेकदा मित्रांबरोबर पबमध्ये जात असे.

तिचे दुसऱ्याबरोबर अफेयर असल्याचा त्याला संशय होता. त्यावरुन तो तिचा पाठलाग करायचा. हे तिच्या ध्यानात आल्यावर त्यांच्यात भांडणेही झाली होती. या संशयाच्या भूतातूनच त्याने तिला मारण्याचा कट रचला. शुक्रवारी रात्री त्याने तिला दारु पाजली आणि फिरायला जाण्याच्या निमित्ताने तिला कारने शहराबाहेर घेऊन गेला. मध्यरात्रीच्या सुमारास तिला सावळी शिवारात नेले आणि तिथे तिचा खुन करुन मृतदेह फेकून दिला. त्यानंतर अशरफ पुन्हा नागपूरला आला.

पोलिसांना खुशी हिचा शनिवारी सकाळी मृतदेह सापडला. तिचा चेहरा आणि उजव्या हाताचा पंजा विद्रुप केला होता. डाव्या आतावर आशु – खुशी असे गोंदलेले आहे. उजव्या हातावर पुरावासदृश काहीतरी उल्लेख असावे. त्यामुळे पुरावा नष्ट करण्यासाठी उजव्या हाताचा पंजा विद्रुप केला होता. याशिवाय डोक्यावर, दोन्ही गुडघ्यावर खोल जखमा होत्या. डाव्या हातावर लव्ह बर्ड चे टॅटू असून छातीच्या डाव्या भागात क्वीन असे इंग्रजीत गोंदले होते.

खुशी हिची ओळख पटल्यावर अशरफ बरोबर ती रहात असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला आपण त्या गावचेच नाही असे दाखविणाऱ्या अशरफला पोलीस खाक्या पडताच त्याने गुन्हा कबुल केला.

अशरफ हा जाताना पाटणसाव येथील टोनाक्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रात्री साडेनऊ वाजता दिसला व परताना मध्यरात्री अडीच वाजता कैद झाला होता. पोलिसांनी अशरफ याला रात्री उशिरा अटक केली आहे.

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा