पुणे : मार्केटयार्डात ‘स्पा’च्या नावाखाली ‘सेक्स रॅकेट’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्पा च्या नावाखाली मार्केटयार्ड येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी थाय स्पा मालक राहूल झांबरे याला अटक करण्यात आली आहे.

मार्केटयार्ड येथील वास्तूश्री कॉम्प्लेक्समध्ये थाय स्पा या नावाने मसाज सेंटर आहे. या ठिकाणी मसाजच्या नावाखाली महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी बनावट ग्राहक पाठविले. वेश्या व्यवसाय केला जात असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा घातला.

थाय स्पा येथे एक महिला मॅनेजर म्हणून काम करत होती. तेथे ४ महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता. त्यात २ थायलंँड तसेच पश्चिम बंगाल, मिझोराम येथील प्रत्येकी एक महिलेचा समावेश आहे. पोलिसांनी स्पा मालक राहुल झांबरे याला अटक केली असून मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –