मुलीच्या लैंगिक शोषणाचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकाची काढली धिंड

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – विद्यार्थीनीला खासगी शिकवणीसाठी बोलवून तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकाची मुलीच्या पालकांनी धुलाई करून त्याची कपडे उतरवून त्याला पोलीस स्टेशन पर्यंत धिंड काढत घेऊन जाण्यात आले आहे. हा सर्व प्रकार बीड जिल्ह्यातील केज या गावी घडला आहे. या प्रकरणी शिक्षकाला मदत करणाऱ्या एका विद्यार्थ्यावर हि गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज शहरातील कानडी रस्त्यावर फिनिक्स नावाने खाजगी शिकवणीचे वर्ग चालवले जातात. सिद्धेश्वर रामराव माने हा व्यक्ती हे शिकवणीचे वर्ग चालवतो. सकाळी संबधित विद्यार्थीनीला आरोपीने परीक्षा असल्याची थाप मारून क्लासेसवर बोलवून घेतले. ती मुलगी शिक्षकाचा फोन आला म्हणून क्लासेसवर गेली. शिकवणीच्या वर्गात ती गेली असता त्या ठिकाणी आरोपी आणि एक विद्यार्थी उपस्थित होता. त्या दोघांनी त्या मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला मात्र ती मुलगी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाली. घरी जाऊन तिने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला.

शिक्षकाने आपल्या मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रकार केल्याने त्या मुलीचे वडील संतापले आणि त्यांनी शिक्षकाच्या अंगावरची कपडे फाडत त्यांना चांगलीच मारहाण केली. त्यानंतर त्याची क्लासेसपासून पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली आहे. पोलीसांनी आरोपी शिक्षकाला आणि त्याच्या सोबत असणाऱ्या विद्यार्थ्यांला अटक केली असून दोघांवर या गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like