‘बॉयफ्रेन्ड शिवाय मुलींना नाही मिळणार एन्ट्री’, ‘या’ कॉलेजचं परिपत्रक व्हायरल, जाणून घ्या वास्तव

नवी दिल्ली : सध्याच्या तरुणपीढीत गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड हा जणू एक ट्रेंडच निघाला आहे. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड नसणारे असे तरुण-तरुणी क्विचितच दिसतील. पण आता हेच बॉयफ्रेंड असणे तरुणींसाठी फायद्याचे ठरणार आहे.

तमिळनाडूच्या कट्टनकुलथूर येथील एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीकडून जारी केलेले एक परिपत्रक मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहे. त्यामध्ये महाविद्यालयाच्या लेटरपॅडवर जारी केलेल्या परिपत्रकात लिहिले, की सिंगल तरुणींना (ज्यांना बॉयफ्रेंड नाही) महाविद्यालयाच्या परिसरात येण्यास परवानगी नाही. विद्यार्थीनींना बॉयफ्रेंड बनविणे बंधनकारक आहे.

दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने पोलिसांकडे तक्रार केली आहे. महाविद्यालयाला बदनाम करण्याच्या हेतूने हे सर्व केले जात आहे, असा आरोप आता महाविद्यालय प्रशासनाकडून केला जात आहे.

असे आहे पूर्ण प्रकरण

महाविद्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात रजिस्ट्रार, कुलपती आणि अध्यक्षांची स्वाक्षरी आहे. त्यामध्ये लिहिले, की महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या प्रेमसंबंधाला प्रोत्साहन देण्यासाठी हे केले जात आहे. तसेच ज्या तरुणींना बॉयफ्रेंड नाही, अशा तरुणींना महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.

परिपत्रक खोटे

सोशल मीडियावर महाविद्यालयाच्या नावे जे परिपत्रक व्हायरल होत आहे. ते परिपत्रक खोटे आहे. त्याच्याशी महाविद्यालयाचा काहीही संबंध नाही. या प्रकरणाची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे, अशी माहिती महाविद्यालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.