केतकी नारायण ‘गर्ल्स’ मध्ये बनली ‘मॅगी’, पहिल्याच सिनेमात ‘HOT’ मुव्हज्

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गर्ल्स या मराठी सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. या पोस्टरमध्ये 3 मुली पाठमोऱ्या अंदाजात टॉप काढताना दिसत होत्या. हे बोल्ड पोस्टर खूपच व्हायरल झालं होतं. अनेकांना प्रश्न पडला होता या मुली आहेत तरी कोण ? यातील मती आणि मॅगी अशी दोन पात्रांची नावे आहेत. मती तर प्रेक्षकांसमोर आली होती. यानंतर आता मॅगी कोण या प्रश्नाचंही उत्तर मिळालं आहे. या सिनेमात केतकी नारायण ही मॅगीची भूमिका साकारत आहे.

मॅगी कशी भेटली याची छान स्टोरी आहे. डायरेक्टर विशाल देवरुखकरने यामागील स्टोरी सांगितली आहे. विशाल म्हणतो, “प्रचंड मेहनत घेतल्यानंतर, जंग जंग पछाडल्यानंतर आम्हाला मॅगी भेटली. जशी मुलगी आम्हाला हवी होती तशी कुठेच सापडत नव्हती. सोशल मीडियावरही कोणी तसं दिसलं नाही. अनेक मुलींनी ऑडिशन दिलं तरीही मनासारखी मॅगी भेटत नव्हती. असे असतानाच कुठूनतरी केतकीचा फोटो समोर आला. केतकीने यासाठी ऑडिशन दिलं. आणि आम्हाला आमची मॅगी सापडली.”

विशाल पुढे सांगतो, “केतकीची निवड झाल्यानंतर काही काळ तिने वर्कशॉप केलं. तिची आकलन क्षमता अफाट आहे. खरं तर बोल्ड भूमिका दिसायला जितकी सोपी असते तितकीच ती साकारणं कठिण असतं. केतकीने हे आव्हान छान पेललं आहे. ती अगदी मॅगीशी समरस झाली आहे.” हा सिनेमा येत्या 29 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. हृषिकेश कोळीने हा सिनेमा लिहिला आहे.

केतकीच्या वर्क्रफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर युथ या मराठी सिनेमात तिने काम केलं आहे. परंतु गर्ल्स सिनेमात ती पहिल्यांदाचा लिड रोल साकारत आहे. तिने साऊथमधील अनेक सिनेमे आणि शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं आहे.

 

visit : policenama.com