‘बॉईज’ला टक्कर देणाऱ्या ‘गर्ल्स’ सिनेमाचा टीजर रिलीज ! (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वीच गर्ल्स या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं होतं. या पोस्टरमधील मुली पाठमोऱ्या होत्या त्यामुळे या कोण आहेत हे माहिती नव्हते. परंतु एकेक करून सर्व गर्ल्स कोण आहेत हे नंतर समोर आले होते. यानंतर आता या सिनेमाचा टीजर समोर रिलीज झाला आहे. या तीन बॉईज गर्ल्सची ओळख करून देताना दिसत आहे. यात मुलींची धम्माल पाहायला मिळत आहे.

Image result for गर्ल्स' सिनेमा

मुलींच्या मस्ती मजेवर आधारीत सिनेमा आतापर्यंत तरी पाहायला मिळाला नाही. म्हणून हीच मजा मस्ती आता गर्ल्स सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचं पोस्टर खूपच बोल्ड होतं. त्यामुळे या पोस्टरची खूप चर्चा झाली होती. याशिवाय तरुणांमध्ये या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. एव्हरेस्ट एंटरटेंमेंट आणि कायरा कुमार क्रिएशन्स प्रस्तुत हा सिनेमा आहे.

चौकटीबाहेर जाऊन आयुष्य जगणाऱ्या आजच्या काळातील मुलींचं जग या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 29 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. टीजरवरून सिनेमाच्या स्टोरीचा थोडा अंदाज लागतो आहे.

Visit : policenama.com