गितांजली एक्स्प्रेसच्या डब्याला आग

जळगाव : पोलीसनामा ऑनालाईन – जळगावहून हावड्याकडे जाणाऱ्या गीतांजली एक्सप्रेसच्या शेवटच्या डब्याला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. गेटमनमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

गीतांजली एक्सप्रेस शिरसोली रेल्वे स्थानकातून जात असताना रेल्वेच्या शेवटच्या डब्याला आग लागल्याचे गेटमनच्या लक्षात आले. या घटनेची माहिती वरिष्ठांना देऊन रेल्वे शिरसोलीपासून काही अंतरावर थांबवण्यात आली. दोन अग्निशमन दलाच्या बंबांनी पाण्याचा मारा करुन ही आग विझवली. यानंतर हा डबा वेगळा करुन गाडी जळगावच्या दिशेने रवाना करण्यात आली.

मनमाड रेल्वेस्थानकावरून मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस रवाना होत असताना याआधीही काही महिन्यांपूर्वी रेल्वे रुळाला तडे गेल्याची बाब वेळीच निदर्शनास आल्याने संभाव्य अपघात टळला होता. गाडी क्रमांक 12859 मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेसला मनमाड रेल्वेस्थानकावर थांबा नाही. गाडी नाशिकहून निघाल्यानंतर थेट भुसावळला थांबते.

गाडी मनमाड रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक 2 वरून वेगात रवाना होत असताना स्टेशन मास्तर कार्यालयासमोर मोठा आवाज झाला होता. त्यामुळे फलाटावरील प्रवाशांमधे संभ्रम निर्माण झाला. फलाटावरील विक्रेत्यांनी ही माहिती स्टेशन मास्तर कार्यालयात दिल्यानंतर युद्धपातळीवर रुळ दुरुस्तीचे काम हाती घेऊन अर्ध्या तासात दुरुस्ती करण्यात आली होती.

ह्याहि बातम्या वाचा-

नगर राष्ट्रवादीकडेच पवारांचा पुनरुच्चार

हातात कोयता घेऊन दहशत पसरविणारा गजाआड

मावळमधून पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब

निवडणुकांच्या तारखांवरुन नव्या वादाला सुरुवात

कष्टाचं झालं चिज ! वेटर बनला पोलिस उपनिरीक्षक

Loading...
You might also like