बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला लोकसभेची १ व विधानसभेच्या २ जागा द्या : मोदी 

अंबाजोगाई : पोलीसनामा आॅनलाइन – राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली तर बीड जिल्ह्यात लोकसभेची एक जागा व विधानसभेच्या दोन जागा काँग्रेस पक्षाला द्याव्यात अशी मागणी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी अंबाजोगाई येथील  जनसंघर्ष यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत केली.

प्रदेश महिला काँग्रेस चिटणीस पदी संगीता तिवारी 

काॅंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेतील जाहिर सभेत बोलताना मोदी म्हणाले, केज विधानसभा मतदार संघात अंबाजोगाई व केज या दोन्ही नगर पालिका काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहेत. काँग्रेस पक्षाची मोठी ताकद या मतदार संघात असल्याने विधानसभेच्या जागा वाटपात कॉंग्रेसने केज मतदार संघाला व बीड मतदार संघाला प्राधान्य द्यावे. तसेच, बीड लोकसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे द्यावा अशी मागणी केली. या मागणीला अशोक चव्हाणांनी उत्तर देत दोनच नाही तर आणखी एक विधानसभेची जागा बीड जिल्ह्याला वाटाघाटीत मागण्यात येईल असे आश्वासन उत्तर सभेत दिले.

जाहिरात

यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी खा. मल्लीकार्जुन खरगे , प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री प्रा. सुरेश नवले, माजी खा. रजनीताई पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आ. सिराजोद्धीन देशमुख, नारायणराव मुंडे, बाबुराव मुंडे, टी.पी.मुंडे, संजय दाैंड, उपस्थित होते.

जाहिरात