बीडमध्ये ‘डमी’ उमेवारांना भलताच ‘भाव’, ‘डमी उमेदवार द्या, अन् निवडून या’च्या पार्श्‍वभूमीवर मुस्लिम मतदारांना ‘आवाहन’

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी पक्षाची कार्यकर्त्यांनी एकवटायला सुरुवात केली आहे. तसंच आपल्या पक्षाला अधिक मते कशी मिळतील यासाठी प्रयत्न सुरु आहे. तसंच ज्या मतदार संघात मुस्लिम मते अधिक आहेत तेथील मतविभाजन कसे करावे यावरही काही रणनीती आखण्यात येतात. मात्र पक्षांच्या अशा काही रणनीतींवर बीडचे समाजसेवक इम्रान जागीरदार यांनी राजकीय पक्षांवर ह्ल्लाबोल केला आहे. डमी मुस्लिम उमेदवार द्या, निवडून द्या, अशी मोहिम सुरु केली असून, लोकांनी राजकीय पक्षांचा धुर्त डाव उधळुन लावावा, असे आवाहन केले आहे. त्यांनी तसं पत्रक जारी केले आहे.

काही राजकीय पक्ष मत विभाजन करून निवडुण येण्यात तरबेज आहेत. विशेष म्हणजे ज्या मतदार संघात मुस्लिम मते निर्णायक ठरू शकतात तेथे मतांचे विभाजन करण्यासाठी अशा लोकांना पुढे केले जाते ज्यांची नगरसेवक म्हणून निवडून येण्याची लायकीही नसते, असं त्यांनी म्हटलं आहे.

आपल्या मतदार संघात निवडून येण्याची शक्यता कमी असते. किंवा पराजयाच्या भितीने अशा प्रकारचे खटाटोप करण्याची राजकीय पक्षांची परंपरा आणि संस्कृती असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे डमी उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरलेल्या उमेदवाराला त्याची औकात माहित असताना सुध्दा निव्वळ, काही पैशांसाठी तो अशा राजकीय पक्षांची व नेते मंडळींची गुलामगिरी करत असतो, अशी बोचरी टीका त्यांनी राजकीय पक्षांवर आणि त्यांच्या उमेदवारांवर केली आहे.

दरम्यान, सर्व प्रकराच्या राजकीय पक्षापासून मुस्लिम समुदायाने अलिप्त रहावे आणि आपल्या मताचे विभाजन होऊ देऊ नये, असे आवाहन त्यांनी केला असून राजकीय पक्षांचा हा डाव म्हणजे डमी उमेदवार द्या निवडून या उधळून लावा, असं आवाहन मुस्लिम नागरिकांना केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –