MS धोनीला भारतरत्नं देवून सन्मानित करा, ‘या’ आमदाराची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी कर्णधार एम.एस धोनीच्या निवृत्तीनंतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्या. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बीसीसीआयला विनंती करतो की धोनीसाठी एक अखेरचा सामना आयोजित करावा. आता काँग्रेस आमदाराने धोनीला देशातील सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी विनंती केली आहे.

धोनीला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी मध्यप्रदेशमधील माजी मंत्री आणि क्राँग्रेस आमदार पी.सी शर्मा यांनी केंद्र सरकारकडे केली. शर्मा यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे. ‘भारतीय क्रिकेटला जगभरात विजेता म्हणून पुढे आणणारे देशाचे रत्न महान कर्णधार एम.एस. धोनीला भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यायला हवे. धोनी खेळातील भारतरत्न आहे. त्याने क्रिकेटमध्ये देशाचे नाव मोठे केले आहे. त्याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानिक करण्यात यावे, असे ट्वीट करण्यात आले आहे. कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि क्रीडा या प्रकाराचा समावेश आहे. क्रीडा क्षेत्रात हा मान आतापर्यंत फक्त सचिन तेंडुलकर यांना मिळाला आहे. धोनीच्या भरीव कामगिरीमुळे त्याला भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी मागणी आता होत आहे. धोनीनं निवृत्तीची घोषणा केल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर भारतरत्नची मागणी केली होती.