चार वर्षांतील पाच लोकहिताची कामे सांगा; मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागांना निर्देश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मागील चार वर्षात केलेली व्यापक लोकहिताची पाच सर्वात प्रभावी कामे सांगा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या सर्व विभागांना दिला आहे. पुढच्याच आठवड्यात स्वत: मुख्यमंत्री विविध विभागांनी दिलेल्या या कामांचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर सर्व विभागांमध्ये या माहितीचे सादरीकरण करण्याच्या दृष्टीने कामाची लगबग सुरू झाली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’939bc839-be19-11e8-8fe8-032310f72c49′]

राज्य सरकारला लवकरच चार वर्षे पूर्ण होत असून लोकसभा निवडणुकही जवळ येऊन ठेपली आहे. यामुळे सरकारने केलेले काम जनतेसमोर मांडण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. राज्य सरकारे लोकहिताची कामे करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप सातत्याने राज्य सरकारवर होत आहे. शिवाय मागील दिवसांपासून राज्यातील अस्थिर परिस्थिमुळे सरकारच्या प्रतिमेलाही धक्का पोहचला आहे. हे चित्र बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड सुरू असून त्यादृष्टीने त्यांनी सर्व विभागांना कामाला लावले आहे. या माहितीचा उपयोग मंत्रिमंडळ विस्तारासाठीही मुख्यमंत्री करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

[amazon_link asins=’B01ID7DBHK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bcb9e7b8-be19-11e8-9035-ada2c2d2953a’]

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारला ऑक्टोबर महिनाअखेरीस चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकाही तोंडावर आल्याने राज्य सरकारच्या चार वर्षांतील कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी सर्व विभागांच्या कामांचा, योजनांचा, निर्णयांचा आढावा घेण्यात येणार आहे. आपापल्या विभागाच्या कामगिरीचा विचार करताना लोकहिताच्या पाच सर्वात प्रभावी योजना-निर्णयांवर प्रामुख्याने भर द्यावा. संबंधित योजनांमुळे राज्यातील किती लोकांना लाभ झाला, लाभाचे स्वरूप काय, त्यामुळे राज्याच्या कामगिरीवर कसा परिणाम झाला याचा विचार करण्यात येत आहे. यासंबंधीची माहिती सर्व विभागांना मुख्यमंत्र्यांना द्यायची आहे.

पिंपरी-चिंचवड बेशिस्त वाहतुकीचे शहर

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या तुलनेत फडणवीस सरकारच्या काळात राज्याची आर्थिक प्रगतीचा वेग मंदावला, असे वित्त आयोगाने आपल्या टिपणात म्हटल्याने राज्य सरकार चांगलेच अडचणीत आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतून सुत्र हलविल्यानंतर घुमजाव करत महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचा निर्वाळा वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग यांनी दिला होता. मराठा, धनगर, मुस्लिम समाज आरक्षणासाठी सातत्याने रस्त्यावर उतरत आहे. तसेच विरोधक शेतकऱ्याच्या मुद्द्यावरून सरकारला सतत लक्ष्य करत असल्याने आगामी निवडणुकांचा विचार करता जनमानसात सरकारची प्रतिमा पुन्हा सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या कामांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू केल्याचे सुत्रांनी सांगितले.