मित्रानं तिच्या सॉफ्ट ड्रिंकमध्ये टाकलं काहीतरी, करायला नको होतं ‘ते’ केलं तरूणीसोबत, लक्षात आल्यावर…

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – एका 21 वर्षीय तरुणीच्या सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. सदर पीडित तरुणी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. ज्या तरुणानं बलात्कार केला तो बार्शीटाकळी येथील रहिवासी आहे. गुरुवारी ही घटना झाल्याचं समोर आलं. आरोपी संदीप वाटमारे याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

बार्शीटाकळीच्या संदीप श्याम वाटमारे यानं खडकी येथील 21 वर्षीय तरुणीसोबत मैत्री केली. कौलखेड परिसरात असताना संदीपनं तिच्या सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकलं. यानंतर ती बेशुद्ध झाली असता तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणीला हा प्रकार लक्षात येताच तिनं त्याला विरोध केला परंतु संदीपनं मात्र नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर तो पुन्हा बलात्काराचा प्रयत्न करू लागला. यानंतर युवतीनं खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला बार्शीटाकळी येथून ताब्यात घेतलं. संदीपविरोधात भारतीय दंड विधानातील कलम 376, 376(2), 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संदीपला जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला 24 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/