शेतकऱ्यांना वेळेत वीज जोडणी द्या,अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नाही : एकनाथ खडसे

नागपूर : पाेलीसनामा ऑनलाईन

शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिलं नाही तर त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असे म्हणत, भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. शेतकरी प्रश्नांवरुन एकनाथ खडसे अधिवेशनात चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले.
[amazon_link asins=’B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1808d89d-8903-11e8-8222-e388c0bf674a’]

शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनचा प्रश्न 2010-11 सालापासून प्रलंबित आहे. शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्याबाबत सरकार निर्णय कधी घेणार आहे, असा सवालही खडसे यांनी विचारला आहे. त्यामुळे खडसेंच्या प्रश्नांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जवळपास 51 हजार शेतकरी वीज कनेक्शनपासून वंचित असून, त्यापैकी जळगावात 17 हजार शेतकऱ्यांकडे वीज कनेक्शन नाही. त्यामुळे  8 वर्षात जर सरकार वीज कनेक्शन देऊ शकत नसेल तर शेतकऱ्यांना मरणाला जवळ करण्याशिवाय पर्याय नाही, असे म्हणत एकनाथ खडसेंनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.
[amazon_link asins=’B07DMXTWXK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1eefa857-8903-11e8-8cbc-15a56cf14c11′]

मागील दिवसापूर्वी देखील खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी सरकारने लाखो रुपये उधळल्याचा आरोप त्यांनी केला होता. खडसेंच्या या आरोपामुळे राज्य सरकारची मोठी पंचाईत झाली होती.