‘फ्लॅट टमी’ तरी देखील ‘नो-टेन्शन’ ! दिवसभरात द्या फक्त 15 मिनिटे, ‘हे’ 7 व्यायाम करा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – फ्लॅट टमीसाठी जिम, योगासह डाएट आवश्यक असते. परंतु, असेही काही उपाय आहेत जे केल्याने जिममध्ये जाण्याची किंवा खूप मेहनत करण्याची गरज भासणार नाही. केवळ दिवसातून पंधरा मिनिटे दिल्यास तुम्ही स्लिम आणि फिट होऊ शकता.

करा हे व्यायाम
1. पाठीवर झोपून हात डोक्याखाली ठेवा. आणि पायाने सायकल चालवण्याची क्रिया करा. यासह हाताचे कोपरे गुडघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. दहा वेळा ही करा.

2. पाठीवर झोपून श्वास आत घ्या. दोन्ही हात कानाच्या बाजूने सरळ ठेवा. नंतर अर्धवट उठून दोन्ही हाताने पायांना व्ही स्थितीत ठेवा. असे दहा वेळा करा.

3. उपडे झोपून पायाच्या पंज्यावर आणि तळ हाताच्या साहाय्याने शरीर उचला. दहा सेकंद याच स्थितीत राहा. असे दहा वेळा करा.

4. एका कुशीवर झोपून एक हात आणि पायाने शरीर उचलून तीस सेकंद याच स्थितीत राहा. दह वेळा असे करा.

5. पाठीवर झोपून दोन्ही पाय उंच करा. दोन्ही पाय एकाच वेळी गुडघ्याने पोटाकडे वळवा. पाच सेकंद हाताने पायांना पकडून ठेवा. पाय सरळ करा. दहा वेळा हा व्यायाम करा.

6. पाठीवर झोपून दोन्ही पाय सरळ करा. हळू-हळू उजवा पाय खाली आणून सरळ करा. नंतर डावा पाय खाली आणत उजवा पाय पुन्हा उंच करा. असे दहा वेळा करा.

7. पाठीवर झोपून पाय सरळ करा. काही सेकंदासाठी थांबून पाय खाली आणत पंचेचाळीस डिग्रीचा कोण तयार करा. काही सेकंद असेच राहा. असे दहा वेळा करा.

फेसबुक पेज लाईक करा –