वाढदिवस साजरा करण्यापेक्षा निधी दुष्काळग्रस्तांसाठी द्या : प्रकाश आंबेडकर 

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – वंचित  बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा येत्या १० मी रोजी वाढदिवस आहे त्यानिमित्त  आंबेडकरांनी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली आहे कि संबंध महाराष्ट्रमध्ये भीषण दुष्काळ आहे त्यामुळे माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करावे. आणि या कार्यक्रमांसाठी जमवलेला सगळा निधी दुष्काळग्रस्तांसाठी वापरण्यात यावा, अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे.
दरम्यान ,आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून  अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी  जाहीर आवाहन केले आहे ते म्हणाले कि महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये दुष्काळ असल्यामुळे  कार्यकर्त्यांना विनंती आहे कि वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करून  कार्यक्रमांसाठी जमवलेला सगळा निधी दुष्काळग्रस्तांसाठी वापरण्यात यावा.
https://twitter.com/Prksh_Ambedkar/status/1126065301685035008