‘वीज कर्मचाऱ्यांना फ्रन्टलाईन वर्कर दर्जा देऊन 50 लाखांचे विमा संरक्षण द्या’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  गतवर्षी कोविड १९( covid 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला. तसेच निसर्ग व तौक्ते चक्रीवादळानंतर कोविड १९( covid 19) संसर्गाचा धोका असतानाही जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या सर्व वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कर्मचारी यांना फ्रन्टलाईन वर्करचा दर्जा देत त्यांना देखील ५० लाखांचे विमा संरक्षण देण्याची मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Maratha Reservation : खा. संभाजीराजेंनी दिला इशारा ; म्हणाले – ‘6 जूनपर्यंत काहीच ठोस सांगितलं नाही, तर…’

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कर्मचारी बजावलेल्या कामगिरीकडे लक्ष वेधले आहे. गतवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस कोविडच्या पहिली लाट सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला. अनेक ठिकाणी वीजेचे खांब पडले. ट्रान्सफॉर्मर बंद पडले. अशावेळी वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कर्मचारी यांनी युद्ध पातळीवर काम करुन वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची कामगिरी केली. मात्र विभागांच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कर्मचारी हे फ्रन्टलाईन वर्कर्सच्या दर्जापासून वंचित राहिले.

झोप येत नसेल तर खा ‘हे’ खास प्रकारचे चॉकलेट, इम्युनिटी बूस्टर सुद्धा, वाढवते एनर्जी

आता कोविडच्या दुसऱ्या लाटेची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अभियान राबविण्यात आले. या काळातही तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला. मात्र स्वतःला कोविडची लागण होण्याचा व जीव गमावण्याचा धोका असतानाही केवळ कर्तव्य म्हणून वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अविरत परिश्रम घेतले. मात्र इतकी चांगली कामगिरी बजावल्यानंतरही अत्यावश्यक सेवेपैकी एक असणाऱ्या वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कर्मचारी यांना फ्रन्टलाईन वर्करचा दर्जा देण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण मिळू शकलेले नाही ही बाब खासदार डॉ. कोल्हे निदर्शनास आणून तातडीने या वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कर्मचारी यांना फ्रन्टलाईन वर्कर म्हणून घोषित करुन ५० लाखांचे विमा संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी सुचवले 3 पर्याय, म्हणाले…

त्याचबरोबर वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कर्मचारी यांचा जनतेशी दैनंदिन येणारा निकटचा संपर्क लक्षात घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचीही मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कर्मचारी यांनी फ्रन्टलाईन वर्कर्स घोषित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र या कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केला.

Pune : …तर त्या विद्यार्थ्याची संपूर्ण फी माफ करावी, भारतीय जनता युवा मोर्चाची मागणी

Disinfect Home : ‘कोरोना व्हायरस’च्या इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी अशाप्रकारे करा घर ‘डिसइन्फेक्ट’, जाणून घ्या

‘या’ 4 एक्सरसाईजच्या मदतीने आपले डोळे ठेवा निरोगी आणि सुंदर !