रोज एकातरी व्यक्तीला द्या ‘जादूची झप्पी’ काय आहे कारण….

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन-एखाद्या व्यक्तीची गळाभेट घेणे उतरत्या वयाच्या लोकांसाठी फिट राहण्याचा सर्वात उत्तम उपचार आहे पहा ते कसे . कॅलिफोर्नियातील एका युनिव्हर्सिटीमध्ये वैज्ञानिकांनी केलेल्या रिसर्चनुसार लोकांना जादूची झप्पी देणे म्हणजेच गळाभेट घेणे हा मानव शरीरातील हाडे आणि मांसपेशींसाठी लाभदायक असून यामुळे लोकांना तरुण झाल्याची जाणीव होत असते असे या संशोधनातून समोर आले आहे.

या रिसर्चनुसार, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, उतरत्या वयात शरीरामध्ये अशा काही रसायनांची कमतरता होते की ज्यामुळे हाडे आणि मांस पेशींमध्ये वेदना होण्यास सुरवात होते. एक मिठी मारल्याने मानवी शरीराला मर्यादित प्रमाणात हार्मोन्स मिळतात. आणि या एका मिठीमुळे हाडाच्या वेदना देखील कमी होतात. आणि आपल्याला पहिल्यापेक्षा जास्त तरुण झाल्याची यामुळे जाणीव होते.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जेव्हा तुम्ही एखाद्याची गळाभेट घेता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला थेट जाणीव करून देता की, तुम्हाला समोरच्या व्यक्तीची किती काळजी आहे. यामुळे दोघांनाही अतिशय चांगले वाटते. एवढेच नाही तर, मिठी मारणे या थेरेपीशी संबंधित असणाऱ्या तज्ज्ञांच्या मतांनुसार व्यक्ती तणावात आणि निराशमय वातावरणात असल्यास त्याच्यावर बोलण्याचा काहीही प्रभाव पडत नाही परंतु त्याला मायेने मिठी मारल्यास  त्याचे मन हलके होते. यामागचे खास कारण म्हणजे संपूर्ण इमोशन्सने गळाभेट घेण्याचा प्रभाव थेट ह्रदय आणि मेंदूवर पडतो. म्हणून रोज एका तरी अशा निराश व्यक्तीला आपण गळाभेट मारून त्याचा तणाव हलका करा आणि त्याचे आयुष्य आनंदमय करा.