समृद्धी महामार्गाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या, भाजपच्या ‘या’ आमदाराची ‘डिमांड’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फडणवीस सरकारचा एक महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिले जात होते. मात्र या महामार्गाला नेमके काय नाव द्यायचे यावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद सुरु होते. फडणवीस सरकारने या महामार्गाला अटल बिहारी वाजपेयींचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सध्याच्या ठाकरे सरकारने या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मात्र भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन समृद्धी महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2649898355100813&id=559874610769875

गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार आहेत. आपल्या मागणीचे एक पत्र देखील गायवाड यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. यामध्ये ते म्हणतात, समृद्धी महामार्ग हा मुंबई ते नागपूर असा आहे. नागपूरला बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक अनुयायांना बौद्ध धर्माची शिक्षा दिलेली आहे तसेच मुंबई दादर येथील चैत्यभूमी देखील बाबासाहेबांचे समाधीस्थळ आहे आणि ही दोनीही ठिकाणे बहुजन समाजासाठी श्रद्धेचे स्थान आहे यामुळे या ठिकाणी राज्यांतून देशांतून अनेक जण येत असतात. म्हणूनच या दोनीही स्थळांना जोडणाऱ्या महामार्गाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी गायवाद यांनी केली आहे.

भाजपचे सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी देखील या समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे नाव आधीच निश्चित झालेले आहे त्यामुळे नावावरून वाद नको असे स्पष्टीकरण दिले होते.

Visit : policenama.com