..त्यांना फाशीचीच शिक्षा द्या, आदिवासी संघटनांचा कचेरीवर मोर्चा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील दोन वर्षाच्या निरागस मुलाची हत्या करणाऱ्या व त्याच्या वडिलांच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आदिवासी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा जातीय अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात यावा, भानगाव प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, विशेष सरकारी वकीलांमार्फत खटला लढविण्यात यावा, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, आदिवासी पारधी व भिल्ल समाजाचा सामाजिक आर्थिक व शैक्षणिक स्तर उंचविण्यासाठी तात्काळ योजना तयार करुन अंमलबजावणी करावी, पिडीत कुटुंबीयांची हेळसांड करणाऱ्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, पिडीत कुटुंबीयांचे सन्मानजनक पुनर्वसन करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.

सदरील घटनेत भा.दं.वि कलम ३०२, ३०७, ३२४, ३२६, ३४ अनु जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ नुसार श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटना ही अत्यंत क्रुरतेचे प्रतिक असून माणुसकीला काळिमा फासणारी असल्याने येणाऱ्या काळात जर आरोपींना फाशीची शिक्षा नाही झाली तर अशा प्रवृत्तीचे मनोबल वाढले. त्यामुळे आरोपींना फाशीची शिक्षा होणे गरजेचे आहे. सदरील प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असली, तरी अद्याप पिडीत कुटुंबीयांना समाज कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आर्थिक मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे. सदरील सर्व प्रकारामुळे पिडीत कुटुंबीयांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असले तरी सर्व समाज तुमच्या सोबत उभा असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. वरील मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास राज्यव्यापी तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी आदिवासी फासेपारधी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र काळे,एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, एकलव्य आदिवासी महासंघाचे अध्यक्ष कैलास माळी, प्रदेश सचिव दत्तात्रय माळी, वंचित बहुजन आघाडीचे तालुका कार्याध्यक्ष प्रमोद काळे,पारधी समाजाचे अभ्यासक प्रा. डॉ बाळासाहेब बळे सर, आदिवासी पारधी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले, भटके विमुक्त मोर्चाचे दादाहीर शिंदे, प्रदेश संयोजक संजय सावंत, भिम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष तात्यासाहेब घोडके, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन नंदकुमार ससाणे,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष कांतीलाल कोकाटे, माजी उपनगराध्यक्ष जालिंदर घोडके,संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हासचिव राजेंद्र राऊत यांनी आंदोलनास पाठींबा जाहीर केला.मानवी हक्क अभियानचे शहर जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड, तालुकाध्यक्ष अशोक मोरे, जिल्हा सचिव चंद्रकांत काळे,योगेश खेंडके, भाऊ पवार,संतोष भोसले,स्वप्नील पवार, काका काळे, रामसींग भोसले, तुषार चव्हाण यांच्यासह आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Visit – policenama.com