नारायण राणेंची मराठा समाजासाठी मागणी, म्हणाले – ‘3 हजार कोटींचे पॅकेज द्या’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना महाविकास आघाडीने गंभीर चुका केल्या. सरकारच्या वकिलांमध्ये समन्वय नव्हता. त्यामुळे मराठा समाजा ( Maratha community )चे आरक्षण गेले. आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीने मराठा आरक्षण मिळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. दरम्यान, आरक्षण मिळेपर्यंत फडणवीस सरकारने जश्या सवलती दिल्या होत्या तश्या शिक्षण आणि रोजगारासाठी सवलती देऊन तीन हजार कोटींची विशेष पॅकेज द्यावे अशी मागणी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे. ते ठाण्यातील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मोड आलेल्या कडधान्यांचे फायदे पहा; उद्यापासूनच खायला सुरुवात कराल

नारायण राणे म्हणाले की, मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस सरकारने कायदा करून आरक्षण दिले. मात्र, महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात अपयशी ठरले. सरकारी वकिलांमध्ये समन्वय नव्हता केवळ पुढची तारीख मागण्यात येत होत्या. यावरून खटला चालवण्यास टाळाटाळ होत असल्याचे स्पष्ट होते. महत्त्वाचे म्हणजे गायकवाड आयोगाचा जो अहवाल आहे त्यातील परिशिष्टचे इंग्रजीत भाषांतर करून दिले गेले नाही. त्यामुळे हा आयोग एकतर्फी असल्याचा समज झाला, अशी टिप्पणी ही राणे यांनी केली.
मराठा आरक्षणासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करायला हवी होती. मात्र तसे काही केले नाही. १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांचा अधिकार अबाधित आहे होण्यासाठी केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल केली आहे. घटना दुरुस्तीनंतरही राज्य सरकारलाच मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा लागेल, असेही राणे यावेळी म्हणाले.

तारुण्यातच टक्कल पडले असल्यास तुमच्यासाठी आहेत ‘हे’ रामबाण उपाय

हे’ 1 आसन केल्यास दूर होतील अनेक आजार, जाणून घ्या

दम्याने त्रस्त असाल तर “घ्या” ही काळजी

 

फडणवीस – पवार भेट अराजकीय
देंवद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीमुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. त्यासंदर्भात नारायण राणे म्हणाले, हि भेट अराजकीय असून यापूर्वी मीदेखील पवार यांना भेटलो. या भेटीमुळे जर कोणाची तब्बेत बिघडत असेल तर त्यांनी औषध घ्यावी, इंजेक्शनदेखील उपलब्ध आहे, अशी टीकाही त्यांनी केली. सध्याची परिस्थिती पहिली तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी सोडला तर इतर पक्ष आम्ही जाऊ असे म्हणतात. पण राष्ट्रवादी कोणीही येऊ दे आम्ही सरकारमध्ये असणार अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडवत सरकार स्थिर राहिले नसून कधीही पडू शकते असा पुनरुच्चार राणे यांनी केला.
या पत्रकार परिषदेस भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, प्रदेश सचिव संदीप लेले, गटनेते मनोहर डुंबरे उपस्थित होते.

READ ALSO THIS :

 

Black Fungus : कोरोनातून रिकव्हरीनंतर सुद्धा होऊ शकतो ब्लॅक फंगसचा धोका, ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

‘या’ कारणामुळे वाढते वजन, जाणून घ्या

घरगुती LPG गॅस सिलेंडर आज ‘स्वस्त’ झाला की ‘महाग’; जाणून घ्या 1 जूनचे दर

वजन कमी करताना येणारा अशक्तपणा धोकादायक