Pune News : आधी 9000 कोटी द्या अन् मगच उर्वरित 23 गावे समाविष्ठ करा, महापौर मुरलीधर मोहोळ यांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेच्या (Pune muncipal Corporation) हद्दीत 2017 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गावांसाठी आधी 9 हजार कोटी द्या, मगच उर्वरित 23 गावांचा (Village) टप्प्याटप्याने पालिकेच्या हद्दीत समावेश करा, अशी मागणी (demand) पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayour Murlidhar Mohol) यांनी राज्य शासनाकडे केली आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये गावे समाविष्ट करुन घेण्यास आमचा विरोध नाही, मात्र, आधीच्या गावांतील नागरी समस्या संपल्या नसल्याचे महापौरांनी म्हटले आहे.

पालिकेच्या हद्दीमधील 23 गावे समाविष्ट करण्याच्या हालचाली राज्य शासन स्तरावर सुरु आहे. या संदर्भात बोलताना महापौर म्हणाले, पालिकेच्या हद्दीत 2017 मद्ये 11 गावांचा समावेश करण्यात आला. या गावांमध्ये रस्ते, पाणी, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधा नाहीत. याठिकाणी टँकरने पाणी पुरवठा होत आहे. रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यातच 23 नव्या गावांचा समावेश झाल्यास आणखी अडचणी वाढतील, त्यामुळे सरसकट गावांचा समावेश न करता टप्प्याटप्याने गावांचा समावेश करावा असे महापौर म्हणाले.

2017 मध्ये समावेश करण्यात आलेल्या 11 गावांचा विकास आरखडा तयार करुन मुलभूत विकास करण्यासाठी नऊ हजार कोटी रुपये देण्याची मागणी केली. या गावांच्या पायाभूत सुविधा उभ्या करताना पालिकेवर आर्थिक ताण येत आहे. त्यामुळे नवीन गावे समाविष्ट करताना राज्य सरकारने निधी द्यावा अशी आग्रही मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.

अजित पवारांच्या पुढाकारातून 23 गावे समाविष्ट

पुणे महापालिका हद्दीत 23 गावे समाविष्ट करण्यासाठी देण्यात आलेल्या प्रस्तावाला नागरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुर दिली आहे. यामुळे ही गावं पुणे महापालिकेत समाविष्ट होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यासंदर्भात अध्यादेश काढण्याची प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर ही गावे पालिकेत समाविष्ट होती, अशी माहिती आमदार चेतन तुपे यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय झाला आहे.