मोबाईल चार्ज करताना ‘या’ बाबींकडे द्या विशेष लक्ष, बसणार नाही मोठा फटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जगभरात स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बहुतांश कामे याच स्मार्टफोनच्या माध्यमातून होत असल्याने त्याची बॅटरी लवकर डाऊन होण्याचा अनुभव अनेकांना आला असेल. पण आपण जेव्हा मोबाईल चार्जिंगला लावतो तेव्हा विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.

जेव्हा आपण मोबाईल चार्जिंगला लावतो. तेव्हा मोबाईलसोबत दिलेल्या कंपनीच्या म्हणजेच ओरिजिनल चार्जरचा वापर करणे गरजेचे आहे. जर तुम्ही दुसऱ्या चार्जरने किंवा साध्या चार्जरने फोन चार्ज केल्यास त्याचा परिणाम बॅटरीवर पडू शकतो. वारंवार अन्य चार्जरने फोन चार्ज केल्यास फोनची बॅटरी खराब होऊ शकते.

कव्हरशिवाय चार्ज करा फोन

अनेकदा लोक कव्हरसोबत फोन चार्जिंगला लावतात. मोबाईल कव्हरसोबत चार्ज केल्यास फोनच्या बॅटरीवर दाब पडतो. परिणामी, बॅटरी खराब होण्याची शक्यता असते.

चार्जिंग App चा वापर टाळा

अनेकदा फोनला लवकर चार्ज करण्यासाठी आपण फास्ट चार्जिंग App ला डाउनलोड करतो. हे App फोनच्या बॅकग्राउंडला सुरु असते. त्यामुळे बॅटरी जास्त खर्च होते. फोनच्या बॅटरीला सुरक्षित ठेवायचे असेल तर अशा App चा वापर करणे टाळावे.

मोबाईल सातत्याने चार्ज करणे टाळावे

गरज असल्यासच मोबाईल चार्ज करावा. सातत्याने चार्ज करणे टाळावे. काही लोक तर बॅटरी 90 टक्के असल्यावरही चार्ज करतात. स्मार्टफोनला वारंवार चार्ज केल्याने त्याचा परिणाम बॅटरीवर पडत असतो. त्यामुळे फोनला वारंवार चार्ज करणं टाळावे.

बॅटरी 20 टक्के झाल्यानंतर करा चार्ज

फोनची बॅटरी जर 20 टक्के झाली किंवा त्यापेक्षा कमी झाल्यानंतर फोनला चार्ज करणे चांगले आहे. त्यामुळे फोनच्या बॅटरीवर कोणताही परिणाम होत नाही.