‘आम्हाला मुंबई – नागपूर बुलेट ट्रेन द्या’, CM उद्धव ठाकरेंची मोदी सरकारकडे मागणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   महाराष्ट्राला बुलेट ट्रेन द्यायचीच असेल तर ती राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणारी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सध्याच्या मुंबई- सूरत बुलेट ट्रेन प्रकल्पाचा उपयोग नाही. बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात सरकार म्हणून सर्व पक्षांनी एकत्र बसून चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल. असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ठाकरे यांनी मत मांडले आहे.

राज्यामध्ये आर्थिक परिस्थिती बिकट असताना कोस्टल रोड आणि बुलेट ट्रेन या दोन प्रकल्पांसंदर्भात सरकारची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी राऊत यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले. बुलेट ट्रेनची गरज नाही असे आपणही म्हणाला होता. बुलेट ट्रेनमध्ये राज्याला फायदा नसून राज्याने यामध्ये गुंतवणूक करणे बरोबर नाही, महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे बुलेट ट्रेनचे नक्की भविष्य काय?, असा प्रश्न राऊत यांनी विचारला. मुंबई- नागपूर अशी बुलेट ट्रेन देण्याची मागणी केंद्राकडे केली. प्रत्येक गोष्टीला एकच बाजू नसते अनेक बाजू असतात. यामध्ये आपण स्थानिक लोकांचा विचार करणे फार महत्वाचे आहे. राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता राज्याला असेल तर मुंबई-नागपूरला जोडणारी बुलेट ट्रेन द्या. माझ्या राजधानीला आणि उप-राजधानीला जोडाणारी बुलेट ट्रेन द्या. यामुळे विदर्भासंदर्भात कारण नसताना दुरावा निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला जातो तो दुरावा नष्ट होईल. जसा समृद्धी महामार्ग होतोय, ज्याला शिवसेना प्रमुखांचे नाव दिले आहे, तशीच मुंबई-नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन मला द्या. मला त्याचा खूप आनंद होईल, असे ठाकरे म्हणाले.