इंजेक्शन दिलेल्या भागात गँगरीन झाल्याने तरुणाचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  युनानी डॉक्टराने ताप आल्यावर इंजेक्शन दिले. पण ज्या ठिकाणी इंजेक्शन दिले, तो भाग सुजला व तेथे गँगरीन झाल्याने तरुणाचा मृत्यु झाल्याचा प्रकार समोर आला आहे. युनानी डॉक्टरने दिलेल्या चुकीच्या औषधामुळे घाटकोपरमधील १९ वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. कार्तिक डेडा असे या तरुणाचे नाव आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5e21e8a6-d368-11e8-aeda-f9dc9a232dbb’]

डॉक्टरांने चुकीचे इंजेक्शन दिल्याने आपल्या भावाचा मृत्यु झाल्याचा आरोप त्याचा भाऊ जयंत डेडा याने केला आहे. डेडा यांनी सांगितले की, कार्तिक १३ आॅक्टोबरला क्लिनिकमध्ये गेला होता. तिथे डॉक्टर शेख यांनी त्याला इंजेक्शन दिले मात्र त्यामुळे कार्तिकला होत असलेल्या त्रासात वाढ झाली. त्याला चालताही येत नव्हतं. यानंतर तीन दिवसांनी कार्तिक पुन्हा क्लिनिकमध्ये गेला. त्यावेळी डॉक्टर शेख यांनी त्याला पुन्हा इंजेक्शन दिले. मात्र क्लिनिकमधून घरी येताच कार्तिक कोसळला, अशी माहिती जयंतने दिली. यानंतर कुटुंबियांनी कार्तिकला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी कार्तिकला चांगल्या उपचारांची गरज आहे, असं सांगत त्याला सायन रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.

शरीराच्या ज्या भागावर डॉक्टर शेख यांनी कार्तिकला इंजेक्शन दिलं होते, त्या ठिकाणी सूज आणि फोड आल्याची माहिती सायन रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी दिली. यानंतर फोडाच्या काही भागाची तपासणी करण्यात आली. त्यामधून इंजेक्शन दिलेल्या भागाला गँगरीन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. सायन रुग्णालयात दाखल केल्यानंतरच्या १२ तासात कार्तिकचा मृत्यू झाला. शेख यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे कार्तिकचा मृत्यू झाल्याचा आरोप सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी केला आहे.

चार मुलांचा बाप बुरखा घालून गेला प्रियसीला भेटायला ,कुटुंबीयांकडून बेदम चोप

जीवघेण्या संसगार्मुळे कार्तिकचा मृत्यू झाला असावा, असा संशय सायन रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. राजेश डेरे यांनी व्यक्त केला. कार्तिकच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी त्याच्या व्हिसेराची तपासणी केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रकरणी पार्क साईट पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे. शेख यांच्या क्लिनिकमधील सर्व औषधे आणि इंजेक्शन्स ताब्यात घेण्यात आली आहेत. शेख यांच्या क्लिनिकची नोंद प्रशासनाकडे आहे. मात्र तरीही आम्ही त्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01M0JSAFU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’92a9f02f-d368-11e8-9f75-a188d8e81041′]

Loading...
You might also like