तरुणीला लिफ्ट देणे पडले महागात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दिल्लीमध्ये  कारचालकांना लिफ्ट मागून लूटणाऱ्या सुंदर मुलींचे रॅकेट कार्यरत आहे. याच प्रकारची  घटना पुण्यात घडली आहे. सुनसान रस्त्यावर रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या तरुणीस लिफ्ट देणे एका शाखा अभियंत्यास चांगलेच महागात पडले आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5a12d598-d043-11e8-aeea-43d989c6f3cd’]
लिफ्ट मागणाऱ्या तरुणीला दुचाकीवर बसविल्यानंतर तिने विनयभंग केल्याचा आरोप करून धिंगाणा सुरू केला. त्यानंतर ब्लॅकमेल करून १४ हजार रुपयांची रोकड घेतल्याची घटना  घडली.  ही घटना साधू वासवानी चौकात बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका ५७ वर्षाच्या शाखा अभियंत्याने फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीनूसार एका २७-२८ वर्षाच्या तरुणीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे नारायण पेठेत राहणारे असून पुणे जिल्हा परिषदेत शाखा अभियंता म्हणून नोकरी करतात. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B07HGBFSC7,B06ZZB71TB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c3110a1a-d043-11e8-bd81-4fef309cb0af’]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बुधवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. साधू वासवानी चौकाजवळ विजय सेल्स येथे एका तरुणीने त्यांना लिफ्ट मागितली. रात्रीची वेळ असल्याने त्यांनी तिला लिफ्ट दिली. काही अंतर पुढे गेल्यानंतर तिने ‘तुम्ही माझा विनयभंग केला’ असा आरोप करून आरडओरडा सुरू केला. हे प्रकरण इथेच मिटवायचे असेल, तर पैसे द्या अशी मागणी केली. तक्रारदार यांच्याकडे घराचा इएमआय भरण्यासाठी काढून ठेवलेली १४ हजाराची रोख रक्कम होती. ही रक्कम काढून घेऊन ती तरुणी निघून गेली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस अधिक तपास करीत आहेत.
स्त्यावरील सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या चित्रफित तपासून पाहून आरोपीचा माग काढला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक मचाले करीत आहेत.
[amazon_link asins=’B00KJI2GIM,B074NW2Q3L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’645ed526-d044-11e8-b057-31d85a823768′]