बदली प्रक्रियेत खोटी माहिती सादर करणे त्या ४४ शिक्षकांना चांगलेच भोवले

नांदेड : माधव मेकेवाड –  जिल्हा परिषद कार्यालय नांदेड येथे विस्थापित शिक्षक कृती समितीने साखळी उपोषण तब्बल ४० दिवस करून त्यांना लबाड शिक्षकांचा भांडा फोड केला आहे यावेळी आनंदाचे १००० शिक्षक, शिक्षिका उपोषणाचा पाठपुरावा करून शासनास त्या ४४ शिक्षकांवर कार्यवाही करण्यास भाग पाडले शासनाच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत खोटी माहिती सादर करून दिशाभुल केल्याप्रकरणी शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील ४४ शिक्षकांवार कारवाई टांगती तलवार आहे.

शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दोषी गुरूजींना एक वेतन वाढ कपातीसह इतरत्र बदलीसाठी तीन दिवसात पुरावे सादर करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या शासनाने पहिल्यांदाच राज्यस्तरावरून ऑनलाईन संगणकिया बदली प्रक्रिया राबवली. बदली प्रक्रियेच्या अवेदनपत्रात वस्तुनिष्ठ, खरी माहिती भरून स्वयंघोषीत प्रमाणीत करणे क्रमप्राप्त होते. मात्र, बदलीचा सोईनुसार लाभ घेण्यासाठी खोटी माहिती भरून गुरूजींनी शासनाची दिशाभुल केली. शिक्षक संघटनांच्या तक्रारीनुसार उघडकिस आलेल्या अनियमितेवरून मुळ जागी पदस्थापेसह एक वेतन कपातीच्या कारवाईचे आदेश जारी करत जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांना कारवाईचे अधिकार बहाल केले.

त्यानुसार मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी तालुका स्तरावरून प्राप्त तक्रारीनुसार प्रस्तावाची छाणणी, सुनावणीद्वारे दोन्ही पक्षांना बाजू मांडण्याची संधी दिली. दरम्यान शिक्षक बदली प्रकरणी राज्यभरातील जिल्हा परिषदांनी दोषींवर कारवाईची फावडी पाडली. बाजु ऐकून तोलण्या पारखण्यात नांदेड जिल्हा परिषदेने वेळ घालवली हे सत्य नाकारता येणार नाही. चुकीची माहिती भरून बदली प्रक्रियेचा लाभ घेणाऱ्या गुरूजींची संख्या अधिक असल्याने जिल्ह्यातील हजार शिक्षकांवर विस्तपीत होण्याची वेळ आली. सेवा जेष्ठतेनुसार खरी माहिती भरूनही खो बसल्याने ६० नरवस गुरूजींनी आप्तईष्ठांच्या माध्यमातून तक्रारी दाखल केल्या. संवर्ग एक ते चारचा लाभ घेण्यासाठी खोटी माहिती भरणाऱ्या शिक्षकांमुळे जिल्ह्यातील हजारावर शिक्षक विस्तापीत झाले.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार राज्यशासनाने रॅंडम राउंडमध्ये पती पत्नी एकत्रीकरण बाजूला सारून सरसकट रिक्त पदांवर विस्तापीत शिक्षकांना पदस्थापना दिल्या. त्यामुळे बहूतांश शिक्षकांनी दिर्घ रजेवर राहून शासनाशी दोन हात केले. तक्रारीनुसार ४४ शिक्षकांनी खोटी माहिती दिल्याचे वारंवार सिद्ध होवूनही शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांनी बुधवारी (ता.१२) दोषी गुरूजींना एक वेतन कपातीसह इतर ठिकाणी बदलीसाठी तीन दिवाच्या पुरव्याची नोटीस बजावल्याने वारंवार दोष निश्‍चित होवूनही जिल्हा प्रशासनाचे नोटीस नाट्य सुरूच आहे. उपोषण वेळी कोणीच अधिकारी फिरकले नव्हते त्या मुळे शासनावर उदासीन असलेला शिक्षक वर्ग आज रोजी अति आनंदित आहे.