तरुणीला लिफ्ट देणे पोलीस अधिकाऱ्याला पडले महागात

फरिदाबाद : वृत्तसंस्था

पोलीस समोरच्या व्यक्तीला पाहताच त्याला ओळखतात असे म्हटले जाते. मात्र, फरिदाबाद मधील एका पोलीस अधिकाऱ्याला एका साध्याभोळ्या दिसणाऱ्या तरुणीने लुटल्याची घटना समोर आली आहे. या तरुणीने पोलीस अधिकाऱ्याकडे लिफ्ट मागितली. पोलीस अधिकाऱ्याने तिचा निरागस चेहरा पाहून तिला लिफ्ट दिली. मात्र, ही लिफ्ट त्याला चांगलीच महागात पडली. या तरुणीने पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत बसताच त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तसेच धमकी देऊन रोख रक्कम आणि एटीएममधून पैसे काढून पोबारा केला. या पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर एनआयटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’19b3a974-c62e-11e8-8cfe-eb699daa6007′]

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एएसआय चरण सिंह हे पोलिसांच्या मिसिंग विभागात तैनात आहेत. शनिवारी दुपारी  ते एनआयटी-५ मधील नीलम चौकजवळ एका ज्युसच्या दुकानात गेले होते. तिथे त्यांना एक तरुणी भेटली. तिने त्यांच्यासोबत बोलण्यास सुरुवात केली. तसेच आपल्या पतीची तब्येत बिघडली असून, आपल्याला तातडीने वल्लभगड येथे जायचे आहे, असे सांगितले. तिचा साधाभोळा चेहरा पाहून सिंह यांनी तिला लिफ्ट देण्याचे मान्य केले.  मात्र कार काही अंतरावर पोहोचल्यानंतर या तरुणीची देहबोली बदलली. तिने या पोलीस अधिकाऱ्यास ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप करून आरडाओरडा करण्याची धमकी दिली.

[amazon_link asins=’B018W8DTH2,B01KJFHEWM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3359d2d3-c62e-11e8-8cf2-357a6b841685′]

तिच्या या वागण्यामुळे पोलीस अधिकारी असलेले सिंह गोंधळले. या तरुणीने त्यांच्याकडील रोख रक्कम काढून घेतली. तसेच त्यांचे डेबिट कार्ड घेऊन एटीएममधूनही रोख रक्कम काढली. तसेच आडवाटेला कार थांबवून पसार झाली. दरम्यान, या तरुणीचे नाव सुनीता असल्याचे पीडित अधिकाऱ्याने सांगितले असून, तिचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विमा कंपनीच्या संचालकांनी विम्याचे १७ लाख हडपले

जाहिरात.