‘हे’ कारण देत काँग्रेसची ‘अध्यक्ष’पद निवडीच्या निर्णयाला ‘बगल’ ; अजूनही ‘सस्पेन्स’ कायम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज काँग्रेस कार्यकारिणीच्या दिल्लीतील मुख्यालयात बैठक पार पडलेल्या बैठकीत काँग्रेस आपल्या पक्षाच्या नवीन अध्यक्षाची निवड करेल अशी अपेक्षा होती आणि या निर्णयाकडे सर्वचजण डोळे लावून होते. मात्र संध्याकाळपासून सुरु असलेली ही बैठक चालू असताना राहुल गांधींना प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ‘काश्मीरच्या प्रश्नाविषयी काही महत्त्वाच्या बाबींवरील चर्चा तातडीने करणे गरजेचे असल्याने बैठकीमध्ये या प्रश्नाविषयी चर्चेला प्राधान्य देऊन अध्यक्षपदाविषयी निर्णय तूर्तास लांबणीवर टाकला आहे.’ मागील अनेक दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदासंबंधी तर्कवितर्क बांधले जात आहेत त्यांना विराम बसण्याची चिन्हे अजूनही दिसत नसून सस्पेन्स कायम आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत नेत्यांनी पुन्हा एकदा राहुल यांनाच अध्यक्षपदी राहण्याची गळ घातली. राहुल सहमत नसल्यास प्रसंगी काही नेत्यांनी अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधी यांचे नाव घेतले. काही नेत्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया, मुकुल वासनिक आणि इका-दुक्का यांचेही नाव घेतले आहे. राहुल यांनी राजीनामा सादर केल्यानंतर आणि सीडब्ल्यूसीने त्याला नकार दिला होता. यास एकूण ७५ दिवस झाले तरीही अजूनही कॉंग्रेसची स्थिती २५ मे प्रमाणेच आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या निराशाजनक पराभवानंतर राहुल गांधी यांनी २५ मे रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर अनेकजणांनी राहुल यांना मानविण्याचा प्रयत्न केला मात्र ते आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिले. तसेच, गांधी परिवारातील व्यक्ती किंवा प्रियंका गांधी सुद्धा काँग्रेसच्या अध्यक्षपदी असणार नाही,असे अनेकदा राहुल गांधी यांनी स्पष्ट केले होते.

आरोग्यविषयक वृत्त