यामी गौतमीचे ग्लॅमरस, बोल्ड अंदाजातील फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री यामी गौतमी सध्या खूपच चर्चेत असल्याचं दिसत आहे. याचे खास कारणही आहे. सध्या यामीचे काही फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. यामी गौतमीने नकुतेच एका मॅगेझीनसाठी फोटोशुट केले आहे. उरी सिनेमात यामी गौतमी ही शेवटची दिसली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ताबडतोड कमाई केली होती. यावेळीच यामीने ग्लोबल स्पा मॅगझीनसाठी फोटोशुट केलं होतं. यातील काही फोटो आता सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

या फोटोंमध्ये यामी गौतमी खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस अवतारात दिसत आहे.

फोटोमध्ये दिसत आहे की, यामीने लाइट कलरचा शॉर्ट ड्रेस घातला आहे.

यामीने अनेक वेगवेगळ्या पोज दिल्याचे दिसत आहे.

विकी डोनर या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यामी गौतमीला काही दिवसांपूर्वीच 7 वर्षे पूर्ण झाली आहेत.

यामीने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांचे मन जिंकले आहे. सिनेमाजगतात यामीने आपले वेगळे स्थान बनवले आहे.

सध्या व्हायरल होणाऱ्या यामीच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसताना आहे. अनेकांनी तिचे हे फोटो शेअरदेखील केले आहेत.