‘कोरोना’च्या उपाचारात भारताला मिळू शकतं मोठं यश, ‘या’ औषधाची तिसर्‍या टप्प्यातील ट्रायल होणार सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी सतत विविध संशोधन केले जात आहे, जेणेकरून रूग्णांना बरे करणे शक्यत व्हावे. याच पार्श्वभूमीवर भारत ग्लेनमार्क फार्मास्युटिकलने म्हटले आहे की, ही तिसर्‍या टप्प्यातील ट्रायल आहे, जी ते सुरू करणार आहेत. यामध्ये दोन अँन्टीव्हायरल औषधे फाविपिरावीर आणि यूमीफिरोवीरच्या मिश्रणाचा रूग्णांवर प्रयोग केला जाईल. संशोधनात म्हटले आहे की, ही ट्रायल 158 हॉस्पिटलमधील रूग्णांवर करण्यात येईल, ज्यांच्यामध्ये कोरोनाची कमी लक्षणे आहेत.

ग्लेनमार्क पहिली फार्मास्युटिकल कंपनी असून तिला डीजीसीआयकडून देशात औषधाची ट्रायल घेण्याची परवानगी मिळाली आहे. ग्लेनमार्कने म्हटले की, त्यांना ट्रायलची परवानगी मिळाली आहे. मुंबई येथील कंपनीत दोन्ही औषधांच्या मिश्रणाची ट्रायल रूग्णांवर होईल. या अँटीव्हायरल औषधाची काम करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. कंपनीने म्हटले की, या औषधाच्या रूग्णांवरील परिणामाचे निरीक्षण केले जाईल.

चांगल्या रिझल्टची आशा
कंपनीचे म्हणणे आहे की, दोन्ही अँटीव्हायरल औषधांचे मिश्रण चांगले क्लिनिकल परिणाम देऊ शकतात. सोबतच हे औषध रूग्णांची रोग प्रतिकारकशक्ती वाढवू शकते. किंवा व्हायरसचा परिणाम मंदावू शकते. ग्लेनमार्क कंपनीच्या व्हाईस प्रेसीडेन्ट डॉक्टर मोनिका टंडन म्हणाल्या, हे औषध खुप सुरक्षित आहे आणि ते कोरोनाच्या रूग्णांवर खुप परिणामकारक ठरू शकते.

प्रत्येकाची नजर या ट्रायलकडे
या औषधाची ट्रायल यशस्वी होते का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. कोरोनाचे वाढते रूग्ण देशासाठी चिंतेची बाब झाली आहे. आतापर्यंत देशात कोरोनाच्या रूग्णांची संख्या दिडलाख झाली आहे. अनेक प्रयत्नांनंतरही संसर्ग कमी होताना दिसत नाही. अशातच या औषधाची ट्रायल यशस्वी झाल्यास हे देशासाठी मोठे यश असणार आहे.