ग्लेनमार्क लाँच करणार FabiFlu ची 400mg ची गोळी , पहिल्या दिवशी खाव्या लागतील 9 गोळ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतीय औषध निर्माता ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स कोरोना व्हायरसच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या फबीफ्लू या औषधाच्या आणखी गोळ्या बाजारात आणणार आहेत. कंपनीने म्हंटले कि, या गोळ्या 400 मिलीग्राम असतील. आतापर्यंत कंपनी 200 मिलीग्राम टॅबलेट पुरवित होती. ग्लेनमार्कचा ह्या टॅब्लेटचा वापर कोविड – 19 च्या सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी केला जात आहे. दरम्यान, 400 मिलीग्राम टॅबलेटच्या किंमतीबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

स्ट्रेंथ वाढल्यामुळे कोविड -19 च्या रुग्णांना घ्याव्या लागतील कमी गोळ्या

ग्लेनमार्क म्हणाले की, 400mg टॅब्लेट लॉन्च झाल्यानंतर कोविड -19 रूग्णांना वारंवार औषधोपचाराच्या त्रासातून मुक्तता मिळेल. रुग्णांना कमी गोळ्यांमध्ये पूर्ण डोस मिळेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कोविड – 19 च्या रुग्णाला पहिल्याच दिवशी दोनदा 9 गोळ्या घ्याव्या लागतील. यानंतर, दुसऱ्या दिवसापासून कोर्स पूर्ण होईपर्यंत, दिवसातून दोनदाच 2-2 गोळ्या घ्याव्या लागतात. दरम्यान, ग्लेनमार्क ही देशातील पहिले औषधनिर्माण कंपनी आहे, ज्यास 400 मिलीग्राममध्ये गोळ्या प्रक्षेपित करण्यास ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे.

कंपनीने आपल्या आर अँड डी प्रोग्राम अंतर्गत वाढविली स्ट्रेंग्थ

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने कोरोना विषाणूच्या सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचारासाठी फबिफ्लू नावाचे अँटिवायरल औषध लॉन्च केले. मुंबईच्या या कंपनीला हे औषध तयार करण्यासाठी आणि बाजारात आणण्यासाठी डीजीसीआय कडून परवानगी मिळाली. कंपनीचे उपाध्यक्ष आणि क्लिनिकल डेव्हलपमेंट चीफ मोनिका टंडन यांनी सांगितले की, आता कंपनीने आपल्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत 400 मी.ग्रा. टॅबलेट तयार केले आहे.

औषधाच्या लाँचिंगनंतर बीएसई वर कंपनीचा शेअर 2.83% वाढला

देशातील कोविड – 19 च्या सौम्य आणि मध्यम पातळीवरील उपचारांसाठी या औषधाच्या मर्यादित आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये रूग्ण किंवा त्याच्या प्रतिनिधींकडून लेखी परवानगी घ्यावी लागते. आतापर्यंत या औषधाचे परिणाम मोठ्या प्रमाणात उत्साहवर्धक आहेत. आज बुधवारीच्या तुलनेत मुंबई स्टॉक एक्सचेंज (बीएसई) वर ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचा साठा 460.15 रुपयांवर आहे.