ताज्या बातम्यामुंबई

Global Air Quality Index | मुंबई जगातील 7 व्या क्रमांकाचे प्रदूषित शहर; जाणून घ्या टॉप 6 शहरांची नावे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Global Air Quality Index | दिवाळीतील रासायनिक फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईतील प्रदूषणात (Mumbai Pollution) मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील प्रदूषण चिंताजनक स्तरावर पोहचले आहे. जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार (Global air quality index) शुक्रवारी (दि.5) मुंबई जगातील 7 वे प्रदूषित शहर ठरले आहे. लक्ष्मी पुजनाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 169 नोंदवला गेला आहे. त्यानुसार मुंबई शहर (Mumbai City) हे जगातील 7 व्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले आहे.

पहिल्या क्रमांकावर 426 हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार दिल्ली शहर (Delhi City) आहे. दिल्ली शहर सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. कोलकाता (Kolkata) शहराचा देखील प्रदूषित शहरांच्या यादीत समावेश आहे. गुरुवारी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक हा मध्यम म्हणजे 162 नोंदवला गेला. तर कुलाबा 290 आणि बीकेसी 290 हवेचा स्तर वाईट नोंदवला गेला होता. नवी मुंबई हवा गुणवत्ता निर्देशांक 118, अंधेरी 135, बोरिवली 142, चेंबूर 162 सह मध्यम तर वरळी येथे हाच निर्देशांक 95 सह समाधान कारक नोंदवला गेला. मात्र मुंबईत शनिवारी पुन्हा एकदा प्रदूषणाची (Global Air Quality Index) पातळी वाढली आहे.

जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांक (5 नोव्हेंबर)

मुख्य शहर          देश                  एक्यूआय (AQI)

दिल्ली                भारत                 426

लाहोर                 पाकिस्तान         246

बीजिंग                चायना               212

बुशकेक               कर्गिस्तान         188

कराची                 पाकिस्तान        182

शिन्यांग              चायना               171

मुंबई                    भारत                169

हे देखील वाचा

Aryan Khan Drug Case |  आर्यन खान प्रकरण घडवून आणलं ! त्याला 100 % अडकवले गेले, NCB चा साक्षीदार विजय पागारेंचा खळबळजनक दावा (व्हिडीओ)

Gram Suraksha Scheme | पोस्ट ऑफिसच्या योजनेत मिळताहेत बंपर रिटर्न, रोज 50 रुपये बचत केल्यास 35 लाख मिळतात ‘रिटर्न’; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : mumbai is the 7th most polluted city in the world listed in the global air quality index

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
Back to top button