Global Economic Recession | कोरोनानंतर आता महागाईचा आगडोंब, कोट्यवधी लोक होतील गरीब, IMF ने दिला हा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Global Economic Recession | आर्थिक आघाडीवर जगासमोरील आव्हाने कमी होण्याचे नाव घेत नाहीत. पहिल्या कोरोना महामारीने (Covid-19) जगभरातील अर्थव्यवस्थांसाठी (Global Economies) कठीण परिस्थिती निर्माण केली. आता जग महागाई (Inflation) च्या प्रभावाने हैराण झाले असून जागतिक आर्थिक मंदी (Global Economic Recession) चा धोका डोक्यावर आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) च्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा (Kristalina Georgieva) यांनी महागाईबाबत असा इशारा दिला आहे, ज्यामुळे जगभरातील धोरणकर्त्यांची चिंता वाढणार आहे.
त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, पुढचे वर्ष म्हणजे 2023 हे देखील आव्हानात्मक असणार आहे आणि आता अनेक दशकांच्या महागाईच्या उच्च पातळीमुळे जगभरातील कोट्यवधी लोक गरिबीच्या दरीत ढकलले जाणार आहेत. (Global Economic Recession)
आणखी अडचणी आणणार 2023 वर्ष
IMF चे व्यवस्थापकीय संचालक (IMF MD) यांनी ’Faceing a Darkening Economic Outlook : How the G20 Can Respond’ या ब्लॉग पोस्टमध्ये हा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, हे वर्ष कमी आव्हानात्मक नसून पुढील वर्षी आव्हाने अधिक गंभीर होतील.
या क्षणी जगाला महागाईच्या उच्च दरापासून दिलासा मिळण्याची कोणतीही आशा दिसत नाही, असे जॉर्जिव्हा यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. कोविड-19 महामारी आणि रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) या दुहेरी आव्हानाला जग आधीच तोंड देत आहे. दरम्यान, महागाईच्या प्रभावामुळे मंदीचा धोका वाढला आहे.
महागाईच्या प्रभावातून तूर्तास दिलासा नाही
त्यांनी म्हटले आहे की, चिंता करण्यासारखी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जगभरातील महागाईचा उच्च दर. पूर्व युरोपात (Eastern Europe) सुरू असलेल्या लढाईमुळे त्यात आणखी वाढ झाली आहे. यापूर्वी, आयएमएफने एप्रिल 2022 मध्ये जारी केलेल्या इकॉनॉमिक आउटलुक (IMF Economic Outlook) मध्ये म्हटले होते की आधीच उच्च पातळी गाठलेली महागाई; दीर्घकाळ त्रासदायक असणार आहे.
आयएमएफच्या अंदाजानुसार, 2022 या वर्षात प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये (Advanced Economies) महागाईचा दर 5.7 टक्के असू शकतो, तर विकसनशील (Emerging Economies) देशांमध्ये हा दर 8.7 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
भारतात सुद्धा महागाईची बिकट स्थिती
सध्या भारत आणि अमेरिकेसह जगातील जवळपास सर्वच देश विक्रमी महागाईशी झुंज देत आहेत.
भारतातील महागाई अनेक वर्षांच्या उच्च पातळीवर आहे. जून महिन्यात घाऊक महागाई (Wholesale Inflation June 2022) चा दर 15.18 टक्के होता.
मे महिन्यातील हे प्रमाण 15.88 टक्क्यांपेक्षा कमी आहे. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत महागाई अजून वाढलेली आहे.
जून 2021 मध्ये घाऊक महागाईचा दर 12.07 टक्के होता.
हा सलग तिसरा महिना आहे जेव्हा घाऊक महागाईचा दर 15 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.
एप्रिल 2022 मध्ये घाऊक महागाईचा दर 15.08 टक्के झाला होता.
यानंतर मे महिन्यात घाऊक महागाईने नवा विक्रम नोंदवला होता.
मात्र, जूनमधील आकडेवारीत काहीशी नरमाई आल्याने दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
1998 नंतर पहिल्यांदाच घाऊक महागाईचा दर 15 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.
त्याच वेळी, किरकोळ महागाई जून महिन्यात 7.01 टक्के होती, जी मे महिन्याच्या तुलनेत 0.3 टक्के कमी आहे.
किरकोळ महागाई (Retail Inflation June 2022) चा दर मे महिन्यात 7.04 टक्के होता.
मात्र, किरकोळ महागाई दर सलग सहाव्या महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्धारित केलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे.
एप्रिल महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7.79 टक्के होता. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेबद्दल बोलायचे झाले
तर, जून महिन्यात महागाईचा दर (US Inflation) 9.1 टक्क्यांवर पोहोचला, जो गेल्या 41 वर्षांतील सर्वोच्च आहे.
Web Title :- Global Economic Recession | international monetary fund imf managing director kristalina georgieva on inflation making people poorer
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Shivsena | ‘शिवसेना फोडणारे शरद पवार नसून संजय राऊत होते’; केंद्रीय राज्यमंत्र्याचा गंभीर आरोप
Maharashtra Rains | राज्यात पुढील 4 ते 5 दिवसांत दमदार पाऊस कोसळणार; हवामान खात्याचा ‘Alert’